Breaking News
दापोली : ‘रेंट-अ-बाइक’ योजना सुरू करा; राज्यमंत्री योगेश कदम यांना निवेदन, पर्यटकांची सोय होणार, स्थानिक तरुणांना रोजगाराच्या संधी मिळणार चिपळूण : सावर्डेच्या गोविंदराव निकम विद्यालयात आधुनिक संगणक कक्ष, Deepak Novochem Technologies Ltd. कडून 20 संगणकांचे योगदान, ग्रामीण विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षणाची संधी दापोली : 612 गुंठे वक्फ जमीन व्यवहाराची चौकशी होणार, अल्पसंख्याक आयोगाचे निर्देश, 15 दिवसांत अहवाल सादर करण्याचे वक्फ मंडळाला आदेश दापोली : आझाद मैदानात सार्वजनिक ठिकाणी मद्यपान, दोघांविरुद्ध गुन्हे दाखल चिपळूण : स्प्रिंग क्लिनिकतर्फे खेंड शाळेला शैक्षणिक पुस्तकसंच भेट, डॉ. यतीन जाधव यांच्यासह सामाजिक कार्यकर्त्यांचे योगदान

दापोली : बीएसएनएल कार्यालयात चोरी

banner 468x60

दापोली शहरातील बीएसएनएल कार्यालयात अनधिकृत प्रवेश करून केबल चोरी केल्याप्रकरणी दापोली पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना दि. ९ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री ११.५७ वाजण्याच्या सुमारास बीएसएनएल कार्यालयात घडली.

याप्रकरणी विजय राम मिना (वय ३५, रा. नम्र विलास भवन, बँक ऑफ महाराष्ट्र शेजारी, आझाद मैदान, दापोली) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून विशाल पर्शराम सर्वे (वय ३०, रा. सडवे सुतारवाडी, ता. दापोली) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीने बीएसएनएल कार्यालयातील ओसी लॅन रूमच्या विंडो एसीचा दरवाजा बाहेरून तोडून व उचकटून आत प्रवेश केला. त्यानंतर संबंधित खोलीतील निळ्या व लाल रंगाची डीसी केबल चोरी करून नेल्याचा आरोप आहे.

या चोरीतील केबलची किंमत सुमारे ७ हजार रुपये असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

याप्रकरणी दापोली पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २०२/२०२६ अन्वये भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ मधील कलम ३३१(३) व ३०५(ई) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास दापोली पोलीस करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *