Breaking News
चिपळूण : शाळेत शिकवताना शिक्षिकेला अचानक श्वास घेण्यास त्रास उपचारादरम्यान शिक्षिकेचा मृत्यू दापोली : आंजर्ले-हर्णे बायपासवर मोठा ट्रक अडकल्याने वाहतूक ठप्प, मोठ्या वाहनांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन दापोली : प्लास्टिकमुक्त दापोलीसाठी जेसीआय दापोलीचा पुढाकार 1800 हून अधिक कापडी पिशव्यांचे वाटप, ‘प्लास्टिकला नकार, कापडी पिशवीचा स्वीकार’चा संदेश रत्नागिरी : एसटीच्या रत्नागिरी विभागात 436 जागांसाठी शिकाऊ उमेदवारी भरती, 29 सप्टेंबरपर्यंत अर्ज भरता येणार चिपळूण : स्प्रिंग स्किन अँड कॉस्मेटॉलॉजी लेसर क्लिनिकमध्ये अत्याधुनिक एआय आधारित लेसर उपचार सुविधा, डॉ. यतिन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली त्वचा उपचारांना हायटेक टच

दापोली : आंजर्ले-हर्णे बायपासवर मोठा ट्रक अडकल्याने वाहतूक ठप्प, मोठ्या वाहनांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन

Screenshot

banner 468x60

दापोली तालुक्यातील आंजर्ले-हर्णे बायपास रस्त्यावर मोठा ट्रक अडकल्याने आज, ११ सप्टेंबर रोजी सकाळी सुमारे १०.३० वाजल्यापासून वाहतूक ठप्प झाली आहे. ट्रक मोठा असल्याने बायपासवरील वळणावर त्याला वळवता न आल्याने तो रस्त्याच्या मधोमध अडकला आहे.

या घटनेमुळे बायपास मार्गावरील मोठ्या वाहनांची वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे. मात्र दुचाकीस्वारांना या ठिकाणाहून मार्ग काढता येत असल्याची माहिती आहे. मोठ्या वाहनांना मात्र पुढे जाता येत नसल्याने वाहनचालकांची गैरसोय होत आहे.

ट्रक हटवून वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू असून, त्यासाठी काही वेळ लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे आंजर्ले-हर्णे बायपास मार्गावरून जाणाऱ्या मोठ्या वाहनचालकांनी सध्या पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

वाहतूक सुरळीत होईपर्यंत वाहनचालकांनी या मार्गावर अनावश्यक गर्दी करू नये आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *