Breaking News
दाभोळ : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर दाभोळ पोलिसांची बैठक, गणेशोत्सवासाठी दाभोळ पोलीस सज्ज, नागरिकांना केल्या महत्त्वाच्या सूचना, पोलीस निरीक्षक अमोल गोरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक  खेड : 28 वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या रत्नागिरीत आजारपणामुळे ३६ वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू खेड : फरूस-आमशेत येथे घरफोडी, छतावरील कौले काढून अज्ञात चोरट्याने घर साफ केले दाभोळ : भिवबंदर (आगरी ) परिसरात 2.800 मेगावॅटचा अणुऊर्जा प्रकल्प, 44 हजार कोटींची गुंतवणूक, जेएसडब्ल्यू एनर्जीसोबत महाराष्ट्र शासनाचा सामंजस्य करार, 8 ते 10 हजार रोजगारांची शक्यता, दापोली आणि रत्नागिरीच्या ऊर्जा क्षेत्राला मोठी झेप

दाभोळ : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर दाभोळ पोलिसांची बैठक, गणेशोत्सवासाठी दाभोळ पोलीस सज्ज, नागरिकांना केल्या महत्त्वाच्या सूचना, पोलीस निरीक्षक अमोल गोरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक 

banner 468x60

आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी तसेच गणेशोत्सव शांततेत आणि उत्साहात पार पाडण्यासाठी दाभोळ सागरी पोलीस सज्ज झाले आहेत. याच अनुषंगाने आज गुरुवार, 10 सप्टेंबर 2026 रोजी दाभोळ सागरी पोलीस ठाण्यात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, साऊंड सिस्टिम चालक तसेच दाभोळवाडी अध्यक्षांची बैठक घेण्यात आली. दाभोळ पोलीस निरीक्षक अमोल गोरे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक घेण्यात आली.

सकाळी ११.२० ते १२.१५ वाजेपर्यंत झालेल्या या बैठकीस सुमारे २५ सदस्य उपस्थित होते. यावेळी पोलिसांकडून गणेशोत्सव काळात घ्यावयाची खबरदारी, कायदा व सुव्यवस्था आणि ध्वनिप्रदूषणासंदर्भात विविध सूचना देण्यात आल्या.

पोलिसांनी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी गणेशोत्सव नियमांचे पालन करून व शांततेत साजरा करावा, असे आवाहन केले. तसेच सोशल मीडियावर धार्मिक द्वेष किंवा जातीय तेढ निर्माण करणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या पोस्ट, संदेश अथवा मजकुराचा प्रसार करू नये, अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या.

गणेशोत्सव पारंपरिक पद्धतीने साजरा करावा. विसर्जनाच्या ठिकाणी पोहता येणाऱ्या सदस्यांनीच विसर्जनाची जबाबदारी घ्यावी, तसेच जातीय तेढ किंवा अश्लीलता निर्माण करणारी गाणी वाजवू नयेत, असेही पोलिसांनी सांगितले.

मंडळ परिसरातील गर्दी नियंत्रणासाठी स्वयंसेवकांची नियुक्ती करावी, तसेच महिलांच्या सुरक्षेसाठी महिला स्वयंसेविकांची व्यवस्था करावी. गणपती मंडळाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे, अग्निशामक सिलेंडर आणि फर्स्ट एड बॉक्स उपलब्ध ठेवणे आवश्यक असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.

विसर्जन मिरवणुकीसाठी पोलिसांनी निश्चित केलेला वेळ आणि मार्ग यांचे काटेकोरपणे पालन करावे, अशी सूचना देण्यात आली. कोणताही अनुचित प्रकार घडल्यास तात्काळ डायल ११२ किंवा दाभोळ सागरी पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहनही करण्यात आले.

ध्वनिक्षेपकाबाबतही पोलिसांच्या सूचना

साऊंड सिस्टिमसाठी ‘आपले सरकार’ पोर्टलवर ऑनलाइन परवानगी घेणे आवश्यक असल्याचे बैठकीत सांगण्यात आले. ध्वनिक्षेपकाचा आवाज निर्धारित मर्यादेपेक्षा जास्त ठेवू नये. ५५ डेसिबलपेक्षा अधिक आवाज आढळल्यास नियमानुसार कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलिसांनी दिला.

तसेच रात्री १० ते सकाळी ६ वाजेपर्यंत लाऊडस्पीकर बंद ठेवणे बंधनकारक असल्याचेही पोलिसांनी स्पष्ट केले.

गणेशोत्सवाच्या काळात सर्व मंडळांनी पोलिस प्रशासनाला सहकार्य करून उत्सव शांततेत, सुरक्षित वातावरणात आणि सामाजिक सलोखा राखत साजरा करावा, असे आवाहन पोलीस निरीक्षक अमोल गोरे आणि दाभोळ सागरी पोलिसांकडून करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *