चिपळूण : गडनदी पुलाखालील विसर्जन घाट उद्ध्वस्त, महामार्ग चौपदरीकरणाच्या कामाचा फटका

banner 468x60

चिपळूणमधील मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामादरम्यान गडनदीवरील पुलाचे काम सुरू असताना आरवली येथील विसर्जन घाट उद्ध्वस्त झाला आहे .

या घाटाचा उपयोग करून चिपळूण व संगमेश्वर तालुक्यातील भाविक गणेश विसर्जन करत होते.
पुलाखालील घाट उद्ध्वस्त झाल्याने विसर्जनासाठी आलेल्या भाविकांना मोठी गैरसोय सहन करावी लागत आहे.

भाविकांना पर्यायी सोयीअभावी अडचणींचा सामना करूनच गणपती विसर्जन करावे लागले.


स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे तातडीने पर्यायी घाटाची व्यवस्था करण्याची मागणी केली आहे. अन्यथा आगामी विसर्जनावेळी आणखी मोठा गोंधळ निर्माण होण्याची शक्यता असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *