रत्नागिरी : पालकमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली 28 सप्टेंबरला जिल्हा नियोजन समितीची बैठक

banner 468x60

उद्योगमंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक सोमवार, २८ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आली आहे.


ही बैठक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील जिल्हा नियोजन समिती सभागृहात होणार आहे. बैठकीस जिल्ह्यातील संबंधित लोकप्रतिनिधी, अधिकारी तसेच समितीच्या सदस्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा नियोजन अधिकारी निवास यादव यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.


जिल्ह्याच्या विकासकामांशी संबंधित विविध विषयांवर या बैठकीत चर्चा करण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *