चिपळूण : सात महिन्यांच्या गर्भवती महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू, चिपळूण पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद

banner 468x60

खेर्डी येथील सात महिन्यांच्या गर्भवती महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. या प्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात बी.एन.एस.एस. कलम १९४ अन्वये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

banner 728x90

पोलीस माहितीनुसार, वैष्णवी हनुमान भोयर (रा. खेर्डी, ता. चिपळूण) यांना दम्याचा त्रास होता. त्या सात महिन्यांच्या गर्भवती होत्या. २४ जून २०२६ रोजी पहाटे त्यांना अचानक फुफ्फुसाचा त्रास व श्वास घेण्यास अडचण निर्माण झाली. त्यानंतर नातेवाईकांनी त्यांना तातडीने चिपळूण येथील श्रद्धा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले.

प्राथमिक उपचारानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना पुढील उपचारासाठी डेरवण येथील वालावलकर रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे उपचार सुरू असताना २४ जून २०२६ रोजी त्यांचा मृत्यू झाला. उपस्थित डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

या घटनेची नोंद चिपळूण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू क्रमांक ३७/२०२६ म्हणून २६ जून रोजी दुपारी १.०६ वाजता करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *