Breaking News
खेड : अस्तानमध्ये बिबट्याचा वावर,शाळेच्या परिसरातही बिबट्याचा वावर; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर दापोली : आझाद मैदानावर भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव, शाळकरी मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर गणपती झाले आता, दिवाळीसाठी गावाला जा विशेष ट्रेनने कोकण रेल्वे मार्गावर 12 विशेष ट्रेन, वाढत्या प्रवासी गर्दीच्या पार्श्वभूमीवर रेल्वेचा निर्णय रत्नागिरी : गणवेशाची कॉलर पकडून होमगार्डचा गळा दाबला, जीवे मारण्याची धमकी, लखन चिकोडीकर विरोधात गुन्हा दाखल, गणेश विसर्जन बंदोबस्तादरम्यान कुवारबांव येथे प्रकार खेड : तालुक्यात 28 सप्टेंबरला ‘सेवा संकल्प अभियान’, 11 महसूल मंडळांत विशेष शिबिरे

चिपळूण : 23 वर्षीय तरुणाची आत्महत्या

banner 468x60

चिपळूण शहरातील मार्कंडी येथील रहिवासी असलेल्या एका २३ वर्षीय तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी दुपारी १ च्या सुमारास उघडकीस आली. या आत्महत्येचे नेमके कारण अद्यापही स्पष्ट झालेले नाही. शुभम रवींद्र सावर्डेकर (२३, मार्कंडी) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.

सावर्डेकर कुटुंब हे अनेक वर्षांपासून शहरातील मार्कडी येथे वास्तव्यास आहेत. शुभम हा इंजिनिअरींगचे शिक्षण घेत होता. असे असताना त्याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना उघडकीस आल्यानंतर मोठी खळबळ उडाली. शुभम याचे वडील रवींद्र सावर्डेकर हे कोकण रेल्वेमध्ये कार्यरत आहेत. या घटनेची माहिती पोलिसांना समजल्यानंतर ते घटनास्थळी गेले होते. शुभम यांने नेमक्या कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली, ते मात्र स्पष्ट झालेले नाही. त्याच्या पश्चात आई, वडील, बहीण असा परिवार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *