दापोली : पर्यावरण संवर्धन आणि प्लास्टिकमुक्त दापोलीच्या दिशेने दापोली नगरपंचायतीने धडक मोहीम राबवली. शहरातील विविध दुकाने व आस्थापनांवर कारवाई करत सुमारे १५ ते २० किलो प्लास्टिक कॅरीबॅग जप्त करण्यात आल्या. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या संबंधितांकडून एकूण १० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
नगराध्यक्षा कृपा शशांक घाग आणि मुख्याधिकारी महेश धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली ही विशेष मोहीम राबविण्यात आली. कारवाईदरम्यान प्लास्टिक कॅरीबॅगचा साठा, विक्री अथवा वापर करणाऱ्या व्यावसायिकांवर नियमानुसार दंडात्मक कारवाई करण्यात आली.
नगरपंचायतीने नागरिक आणि व्यापाऱ्यांना प्लास्टिक कॅरीबॅगचा वापर पूर्णपणे टाळण्याचे आवाहन केले आहे. यापुढे प्लास्टिक कॅरीबॅगची विक्री किंवा वापर करताना कोणी आढळल्यास त्यांच्यावर कठोर कायदेशीर व दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.
या कारवाईत नगरपंचायतीचे कर्मचारी रिलेश गुरव, शितल शेठ, अरुण मोहिते, सुनील टांक, शशिकांत रहाटे, संदिप डिंगणकर, मंगेश जाधव, वैभव कुमटेकर, अनिकेत सिंगारे आणि सुधीर जाधव यांनी सहभाग घेतला.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













