Breaking News
रत्नागिरी : ऑनलाईन बँकिंग फसवणूक करणारे भामटे गजाआड, साखरी येथील ४.८२ लाखांच्या अपहारप्रकरणी मुसक्या आवळल्या; तांत्रिक तपासाला मोठे यश रत्नागिरी : हातखंबा येथे चार वाहनांची साखळी धडक; ट्रक क्लिनर गंभीर जखमी, महामार्गावर काही काळ वाहतूक ठप्प रत्नागिरी: कौटुंबिक वादातून विवाहितेची आत्महत्या, उंदीर मारण्याचे औषध प्राशन करून आत्महत्या मंडणगड : बामणघरमध्ये जमीन घोटाळा, बाप लोकांनी जमिनीच्या मालकालाच लावला चुना, “पॉवर ऑफ अ‍ॅटर्नीचा गैरवापर, 52 एकर जमीन लाटली, 41 लाखांचा घोटाळा उघड दापोली : एसटी स्टॅन्डजवळ इको गाडीतून बेकायदा दारू वाहतूक पकडली, 2.30 लाखांचा मुद्देमाल जप्त

खेड : तरुणाच्या मृत्यूस कारणीभूत कारचालकावर गुन्हा

banner 468x60

खेड-आंबवली मार्गावरील खालची हुंबरीनजीकच्या वळणावर दुचाकीला धडक देत दुचाकीस्वाराच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी इर्टिगा कारचालक स्वप्निल अनिल लाड. (२८ रा. तळे-सात्विकवाडी) याच्यावर मंगळवारी सायंकाळी उशिरा येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हा अपघात ९ मार्च रोजी घडला होता. या अपघातात संकेत प्रदीप कदम (३०, रा. हुंबरी, खेड) या तरुणाचा उपचारदरम्यान मृत्यू झाला होता.

banner 728x90

तो दुचाकीवरून (एम.एच. ०८ ए.एक्स. ६०२४) जात असताना समोरुन येणाऱ्या इर्टिगा कारचालकाने (एम.एच. १२ डी.के. ६२२९) रस्त्याच्या विशिष्ट परिस्थितीकडे दुर्लक्ष करत दुचाकीला धडक देवून तरुणाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा ठपका त्याच्यावर ठेवण्यात आला आहे. या बाबत पोलीस हेडकॉन्स्टेबल अजय इदाते यांनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *