मंडणगड : दापोली ते मंडणगड रस्त्याची ‘चाळण’ की चाळणीचा ‘रस्ता’ ?

banner 468x60

दापोली ते मंडणगड रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. दापोली फाटा ते मंडणगड शहरापर्यंतचा रास्ता नादुरुस्थ झालेला आहे. रस्त्याची डागडुजी लवकरात लवकर करण्याची मागणी नुकतीच मंडणगडचे राष्ट्रवादीचे तालुका युवक अध्यक्ष लुकमान चिखलकर यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे केली आहे.

आंबडवे ते महाड येथील राजेवाडी या राष्ट्रीय महामार्गाचे काँक्रीटीकारणाचे काम सद्या प्रगतीपथावर आहे. या नूतनीकरणाच्या कामामुळे दुर्लक्षित झालेल्या दापोली फाटा ते मंडणगड शहरापर्यंतचा रस्ता नादुरुस्थ झाला असून या रस्त्याच्या अंतरात केवळ खड्यांचेच साम्राज्य पाहायला मिळते.

अनेक वेळा बाईकस्वारांच्या अपघातांच्या घटना घडल्या आहेत. शहरठिकाणी जाणाराच रस्ता नादुरुस्थ झाल्याने शहरात येणाऱ्या सर्वांचीच तारांबळ होते. आजारी व्यक्तींना या मार्गावरून प्रवास करणे म्हणजे अधिकच त्रासदायक होते. भिंगळोली येथील तहसील कार्यालय, पोलीस ठाणे, न्याय,

ग्रामीण रुग्णालयासह काही दवाखाने शाळा, महाविद्यालये याच मार्गावर असल्याने या मार्गावरील रहदारीचे प्रमाण सर्वाधिक आहे. सद्या दोन वाहने या रस्त्यावरून पास होताना जिकरीचे ठरते. त्यामुळे अनेकदा अपघातांच्या शक्यता निर्माण होतात. याबाबत प्रवाशी व नागरिकांमधून वारंवार संताप व्यक्त होत आहे.

तरीदेखील यावर योग्य कार्यवाही होत नाही. या बाबीची दखल घेत युवक अध्यक्ष लुकमान चिखलकर यांनी किमान या अंतरातील मार्गावरील खड्डे बुजवून, साईड पट्टीची डागडुजी करून हा मार्ग लवकरच वाहतुकीस सुस्थितीत करावा, अशी मागणी त्यांनी महामार्ग प्राधिकरणाकडे केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *