Breaking News
चिपळूण : सावर्डे रेल्वे स्थानकाच्या विकासाला नवी गती! पादचारी पुलाचे भूमिपूजन, बुकिंग सेंटर आणि रेल्वे थांब्यांसाठी शेखर निकम यांचा पाठपुरावा खेड : बाजारपेठेत वाहतुकीला अडथळा, मालवाहू रिक्षा आणि ट्रकचालकावर गुन्हा दाखल मंडणगडच्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी विद्यार्थ्यांचे श्रमदान, निवळी नदीवर बांधला बंधारा, नूतन विद्यामंदिरच्या विद्यार्थ्यांचा जलसंवर्धनासाठी पुढाकार दाभोळ : पंचनदी-कोळथरेसाठी रुग्णोपयोगी साहित्य केंद्र सुरू; ग्रामीण रुग्णांना मोठा दिलासा चिपळुण : 99 रुपयांत अस्थिविकार आणि हाडांच्या ठिसूळपणाची तपासणी, अपरांत हॉस्पिटलतर्फे आज विशेष शिबिर!

दापोली : चोरी करणार्‍या तरुणाला दापोली पोलिसांनी घेतलं ताब्यात

banner 468x60

दापोली तालुक्यातील करंजाळी येथील एका बंद घरातून घरी कोणी नसल्याचा फायदा घेत कपाटातील ठेवलेले सोन्याचे दागिने चोरून नेणार्‍या एका तरूणास दापोली पोलिसांनी मोठया शिताफीने मुंबई नागपाडा येथून ताब्यात घेतले.

याबाबत दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरूवार दि. २० मार्च रोजी सायंकाळी ५.४५ वाजण्याच्या सुमारास करंजाळी येथून संशयित सुनिल मोहन मोरे, वय ४२, रा. वसई याने फिर्यादीचे राहत्या घरातील बेडरूममध्ये किचनच्या भिंतीवरून प्रवेश करून बेडरूममध्ये कोणीही नसल्याचे फायदा घेत कपाटातील सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना घडली होती.

संशयिताचा दापोली पोलिस शोध घेत असताना त्यांना त्याच्या मोबाईलचे लोकेशन मुंबई येथे असल्याचे निदर्शनास आले. दापोली पोलिस ठाण्याचे पोलिस हेडकॉन्स्टेबल अभिजीत पवार, पोलिस कॉन्स्टेबल सुहास पाटील, विजय सातर्डेकर यांनी लागलीच मुंबई येथे जावून संशयित आरोपीचा शिताफीने शोध घेत त्याला नागपाडा येथून ताब्यात घेतले.

त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने आपला गुन्हा कबुल केल्याने त्याला रविवार दि. २३ मार्च रोजी दापोली पोलिस ठाण्यात आणण्यात आले. संशयित सुनिल मोरे याच्यावर दापोली पोलिस ठाणे गुन्हा रजिस्टर ५२/२०२५ भारतीय न्यायसंहिता २०२३ चे कलम ३०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर गुन्ह्यात चोरीस गेलेला माल दापोली पोलिसांनी हस्तगत करून संशयित सुनिल मोरे याला सोमवार दि. २४ मार्च रोजी दापोली न्यायालयात हजर केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *