गुहागर : कार दरीत कोसळून व्यावसायिकाचा मृत्यू

Screenshot

banner 468x60

गाडीवरील ताबा सुटून गाडी रस्त्याच्या बाजूला २० फूट खोल दरीत कोसळून झालेल्या अपघातात चिरेखाण व्यावसायिकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

अभय अरविंद ओक (५२, मूळ रा. वेळंब, सध्या रा. आबलोली, गुहागर) असे कारचालकाचे नाव आहे. हा अपघात शुक्रवारी सकाळी कोतळूक येथे झाला. –
अभय ओक यांचे चिरेखाण व्यवसायाबरोबर आबलोली येथे मेडिकल आहे.

शुक्रवारी ते बँकेचे काम करून आबलोलीहून कोतळूक येथे कारने (एमएच ०८ एपी ३७७७) घरी येत होते. कोतळूक कावणकरवाडी भागात ते आले असता त्यांचा गाडीवरील ताबा सुटला.

त्यानंतर गाडी उजवीकडे रस्त्याखाली वीस फूट खाली दगडावर व झाडावर जाऊन आदळली. गंभीर दुखापत झाली असल्याने त्यांना तातडीने डेरवण येथे दाखल करण्यात आले होते. तेथे उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात आई, पत्नी व मुले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *