Breaking News
रत्नागिरी : कौटुंबिक वादातून मेहुण्यावर लोखंडी फुकणीने हल्ला, डोक्यात सात ते आठ वार, दोघांविरोधात गुन्हा दाखल रत्नागिरी : आजाराच्या त्रासाला कंटाळून 36 वर्षीय विवाहितेने जीवन संपवले मंडणगड : येथे शेतजमिनीवरील सीसीटीव्ही यंत्रणाच चोरट्यांनी पळवली, चार सीसीटीव्ही कॅमेरे आणि डीव्हीआर मशीन लंपास दापोली बसस्थानकाजवळ अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळला , मृत व्यक्तीचे वय अंदाजे 45 वर्षे, ओळख पटविण्याचे आव्हान, दापोली पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद चिपळूण : डॉ. यतीन जाधव आणि डॉ. वैशाली जाधव यांचा गौरव; एबीपी माझा ‘आरोग्यरत्न’ पुरस्काराबद्दल विशेष कौतुक सोहळा, चिपळूणमधील तीन वाचनालयांचा संयुक्त पुढाकार

चिपळूण : अपघातात जखमी झालेल्या तरुणाचा मृत्यू

banner 468x60

चिपळूण येथील भिले बसथांबा येथे तीव्र उताराच्या वळणावर झालेल्या दुचाकी अपघातात गंभीर जखमी झालेल्या करंबवणे येथील २९ वर्षीय रसिक सिद्धार्थ पवार याचा १४ मार्च रोजी उपचारादरम्यान खासगी रुग्णालयात मृत्यू झाला.

या प्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात सोमवारी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. ८ मार्च रोजी रात्री १० वाजता मिले बस थांबा येथे चिंचेच्या झाडाजवळ तीव्र उताराच्या वळणावर रसिकचे दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने रस्त्यालगत असलेल्या गटारात दुचाकी पडून अपघात झाला होता.

यावेळी त्याच्या डोक्याला सरगंभीर दुखापत झाली होती. त्याला उपचारासाठी खासगी रुग्णालयात नेण्यात आले. त्याच्यावर उपचार सुरू असतानाच शुक्रवारी मृत्यू झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *