क्षेत्रीय कार्यालया साठी शंभर दिवसांच्या कृती आराखडा कार्यक्रमा अंतर्गत रविवार दिनांक १६ मार्च रोजी उपविभागीय अधिकारी कार्यालय दापोली आणि तहसील कार्यालय दापोली यांच्या संयुक्त विद्यमाने हर्णे सुवर्णदुर्ग किल्ल्याची स्वछता करण्यात आली.
सदर स्वच्छता मोहीममध्ये उपविभागीय अधिकारी दापोली सूर्यवंशी, तहसीलदार अर्चना बोंबे,नायब तहसीलदार आडमुठे, वैशंपायन रावसाहेब तसेच महसूल विभागाचे कार्यालयीन सर्व कर्मचारी, मंडळ अधिकारी, तलाठी उपस्थित होते.
सुवर्णदुर्ग किल्ल्यावर वाढलेले गवत काढून स्वच्छता करण्यात आली तसेच आतील व बाहेरील प्लास्टिकच्या बॉटल्स व इतर कचरा गोळा करून नष्ट करण्यात आला.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*















