Breaking News
रत्नागिरी : कौटुंबिक वादातून मेहुण्यावर लोखंडी फुकणीने हल्ला, डोक्यात सात ते आठ वार, दोघांविरोधात गुन्हा दाखल रत्नागिरी : आजाराच्या त्रासाला कंटाळून 36 वर्षीय विवाहितेने जीवन संपवले मंडणगड : येथे शेतजमिनीवरील सीसीटीव्ही यंत्रणाच चोरट्यांनी पळवली, चार सीसीटीव्ही कॅमेरे आणि डीव्हीआर मशीन लंपास दापोली बसस्थानकाजवळ अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळला , मृत व्यक्तीचे वय अंदाजे 45 वर्षे, ओळख पटविण्याचे आव्हान, दापोली पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद चिपळूण : डॉ. यतीन जाधव आणि डॉ. वैशाली जाधव यांचा गौरव; एबीपी माझा ‘आरोग्यरत्न’ पुरस्काराबद्दल विशेष कौतुक सोहळा, चिपळूणमधील तीन वाचनालयांचा संयुक्त पुढाकार

खेड : कळंबणी येथे बांग्लादेशीला आश्रय देणाऱ्याचा शोध जारी

banner 468x60

मुंबई-गोवा महामार्गावरील कळंबणी-आपेडे फाटा येथे एका हॉटेलजवळील बांधकामाठिकाणी काम करत असताना दहशतवादविरोधी पथकाने जेरबंद केलेला अकबर अबू शेख (६५) या बांग्लादेशी नागरिकास आश्रय देणाऱ्या व्यक्तीचा येथील पोलिसांकडून शोध जारी करण्यात आला आहे. कोरोनाच्या संकटापासून चिपळूणनंतर येथे वास्तव्यास असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.


कळंबणी आपेडे फाटा येथे सुरू असलेल्या बांधकामाच्या ठिकाणी बांग्लादेशी नागरिक बेकायदेशीरपणे वास्तव्यास असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर दहशतवादविरोधी शाखेतील पोलीस हेडकॉन्स्टेबल महेश गुरव, आशिष शेलार, योगेश तेंडुलकर, पोलीस नाईक रत्नकांत शिंदे, पोलीस कॉन्स्टेबल गोवर्धन राठोड यांच्या पथकाने बांग्लादेशी नागरिकाच्या मुसक्या आवळल्या.

त्याला १५ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. येथील पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली असता कोरोना महामारीपासून येथे वास्तव्यास असल्याची कबुली दिली.

सुरूवातीला चिपळुणात आश्रय देणाऱ्या व्यक्तीचा पोलिसांकडून शोध घेण्यात येत आहे. तपास पोलीस निरीक्षक नितीन भोयर करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *