Breaking News
दाभोळ : आघारीत 54 वर्षीय व्यक्तीचा संशयास्पद अवस्थेत मृत्यू, भुंडावड परिसरात आढळले होते बेशुद्ध खेड : अस्तानमध्ये बिबट्याचा वावर,शाळेच्या परिसरातही बिबट्याचा वावर; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर दापोली : आझाद मैदानावर भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव, शाळकरी मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर गणपती झाले आता, दिवाळीसाठी गावाला जा विशेष ट्रेनने कोकण रेल्वे मार्गावर 12 विशेष ट्रेन, वाढत्या प्रवासी गर्दीच्या पार्श्वभूमीवर रेल्वेचा निर्णय रत्नागिरी : गणवेशाची कॉलर पकडून होमगार्डचा गळा दाबला, जीवे मारण्याची धमकी, लखन चिकोडीकर विरोधात गुन्हा दाखल, गणेश विसर्जन बंदोबस्तादरम्यान कुवारबांव येथे प्रकार

रत्नागिरी : दोन कारमध्ये अपघात, वाहनांचं नुकसान

banner 468x60

पावस ते रत्नागिरी रस्त्यावरील फणसोप हायस्कूल समोरील स्पिड ब्रेकरवर दोन मोटारीमध्ये धडक झाली. या अपघातातील संशयित मोटार चालकाविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अक्षय सतीश सुर्यवंशी (वय २६) असे संशयित मोटार चालकाचे नाव आहे. ही घटना २८ फेब्रुवारीला सकाळी सव्वा अकराच्या सुमारास फणसोप हायस्कूल समोरील रस्त्यावरील स्पीड ब्रेकर येथे घडली.


पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार खबर देणार प्रेम रजनीकांत पवार हे मोटार (क्र. एमएच-०८ एएक्स ९८३०) घेऊन रत्नागिरी ते पावस असे प्रवासी घेऊन जात असताना फणसोप हायस्कूल येथे आले असताना पाठीमागून येणाऱी मोटार (क्र. एमएच-१४ डी एन ३११४) वरील संशयित चालक अक्षय सुर्यवंशी याने धडक दिली.

या अपघातात दोन्ही मोटारीचे नुकसान झाले. या प्रकरणी पोलिस हवालदार प्रवीण बेंदरकर यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयित मोटार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *