Breaking News
दाभोळ : आघारीत 54 वर्षीय व्यक्तीचा संशयास्पद अवस्थेत मृत्यू, भुंडावड परिसरात आढळले होते बेशुद्ध खेड : अस्तानमध्ये बिबट्याचा वावर,शाळेच्या परिसरातही बिबट्याचा वावर; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर दापोली : आझाद मैदानावर भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव, शाळकरी मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर गणपती झाले आता, दिवाळीसाठी गावाला जा विशेष ट्रेनने कोकण रेल्वे मार्गावर 12 विशेष ट्रेन, वाढत्या प्रवासी गर्दीच्या पार्श्वभूमीवर रेल्वेचा निर्णय रत्नागिरी : गणवेशाची कॉलर पकडून होमगार्डचा गळा दाबला, जीवे मारण्याची धमकी, लखन चिकोडीकर विरोधात गुन्हा दाखल, गणेश विसर्जन बंदोबस्तादरम्यान कुवारबांव येथे प्रकार

पावस : गावखडी येथे नऊ जणांकडून एकाला मारहाण

banner 468x60

पावस तालुक्यातील गावखडी ग्रामपंचातीच्या समोर विषय मिटवायचा होता तर मिटींग का घेतात असे भाष्य करणाऱ्याला नऊ जणांनी मारहाण केली. या प्रकरणी पुर्णगड सागरी सुरक्षा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संतोष सन्मुख तोडणकर, आकाश अशोक तोडणकर, अक्षय अशोक तोडणकर, अनिकेत अशोक तोडणकर, ऋतिक दिवाकर सुर्वे, निनाद प्रकाश पाटील, शुभंम दिगंबर पाटील, साईऱाज राजेश मयेकर व अर्जुन संतोष तोडणकर अशी संशयितांची नावे आहेत.

ही घटना २८ फेब्रुवारीला सायंकाळी सहाच्या समोर अनिकेत मुड्ये जवळ गावखडी येथे घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी सुगंध मधुकर पाटील (वय ४२) हे ग्रामपंचायत कार्यालयातून मिटींग संपवून लोक बाहेर येत असताना पाटील म्हणाले की,

विषय मिटवायचा होता तर मिटींग का घेतात असे मोठ्याने बोलल्याचा राग संशयिताना आला व त्यांनी लाकडी स्टंप व बांबूने फिर्यादी सुंगध पाटील यांना मारहाण केली. या प्रकरणी पाटील यांनी पुर्णगड पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी नऊ संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *