दापोली : रमजान सुरु असतानाच नशेमन कॉलनीमध्ये राडा, स्नूकर खेळत असताना वाद, दोन टाके, डोक्यात मारून केलं जखमी, आलम बेपारी, दाऊद बेपारी, आकिब बेपारी, कादिर बेपारी, आदम बेपारीविरोधात गुन्हा दाखल

banner 468x60

दापोली शहरातील नशेमन कॉलनी येथे स्नूकर खेळत असताना झालेल्या वादातून एकाच्या डोक्यात लाकडी दांडा मारून त्याला जखमी केल्याप्रकरणी ५ संशयीताविरोधात दापोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत दापोली पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार नाजीफ नाजीम रखांगे आणि आलम बेपारी हे नशेमन कॉलनी येथे गुरुवारी (ता.६) रोजी सायंकाळी ५.३० चे सुमारास स्नूकर खेळत होते तेव्हा तेथे आलेले जुनेद मुल्ला यांनी आलम बेपारी याला तुमचे खेळून झाले असेल तर आम्ही खेळतो. तेव्हा नाजीफ रखांगे म्हणाले कि त्याच्याशी काय बोलतोस आपण खेळूया.

याचा आलम बेपारी याला राग आला व त्याने शिवीगाळ व धक्काबुक्की करून एक लाकडी दांडका आणून तो नाजीफ रखांगे यांच्या डोक्यात मारला व तेथे असणारे आदम बेपारी, दाउद बेपारी, आकीब बेपारी, कादिर बेपारी यांनीहि नाजीफ रखांगे याला लाथाबुक्याने मारहाण केली. यात रखांगे यांच्या डोक्याला दोन टाके पडले.

याप्रकरणी नाजीफ रखांगे यांनी या ५ संशयीताविरोधात दापोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गायकवाड करत आहेत.
१ आलम बेपारी 2) दाऊद बेपारी 3) आकिब बेपारी 4) कादिर बेपारी 5) आदम बेपारी याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *