Breaking News
चिपळूण : सावर्डेतील 13 वर्षीय अपहरण झालेल्या मुलीचा मुंबईत शोध, संबंधित युवक पोलिसांच्या ताब्यात, चार दिवसांच्या शोधमोहिमेनंतर रत्नागिरी पोलिसांना यश; स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची विशेष पथके मुंबईत दाखल, मुलगी सुरक्षित रत्नागिरी : रस्त्यावर फिट आल्याने 30 वर्षीय तरुणाचा मृत्यू, उपचारादरम्यान सिव्हिल हॉस्पिटलमध्ये प्राणज्योत मालवली संगमेश्वर : मार्लेश्वर दर्शनाला आलेल्या सहा वर्षीय चिमुकलीचा दगड डोक्यात पडून मृत्यू, दोघे जखमी रत्नागिरी : डायलिसिस सेवा बंद करण्याचा प्रयत्न केल्यास कंपनीवर कारवाई करणार उदय सामंतांचा इशारा, रत्नागिरी जिल्ह्यातील पाचही डायलिसिस केंद्रे सुरू राहणार चिपळूण : प्रशांत यादव यांच्या ‘स्वामिनी’ निवासस्थानी भाजपचा दिवाळी स्नेहमेळावा, पदाधिकारी, कार्यकर्त्यांची मोठी उपस्थितीखेर्डी येथे दिवाळी फराळाचे आयोजन, स्नेहबंध दृढ करत अनौपचारिक संवादातून साधला संवाद

रत्नागिरी : बोर्डींग रोड येथील विवाहित महिलेची आत्महत्या

banner 468x60

रत्नागिरी शहरातील बोर्डींग रोड येथील विवाहित महिलेने साडीने गळफास घेतला. उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते.

तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला तपासून मृत घोषित केले. शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. निकिता गौतम तुपेरे (वय ४०, रा. मिशन कॅम्प, बोर्डिंग रोड, रत्नागिरी) असे गळफास घेतलेल्या विवाहित महिलेचे नाव आहे.

ही घटना रविवारी (ता. २) सकाळी साडेनऊच्या सुमारास निदर्शनास आली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार निकीता तुपेरे हिने कोणत्यातरी अज्ञात करणाने घराच्या वरच्या माळ्यावरील रुममधील लाकडी भाळाला (वाशाला) नायलॉनची साडी बाधून गळफास घेतला.

नातेवाईकांनाच्या लक्षात आल्यावर तात्काळ तिला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. उपचार सुरु असताना सकाळी साडेदहाच्या सुमारास जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *