Breaking News
खेड : अस्तानमध्ये बिबट्याचा वावर,शाळेच्या परिसरातही बिबट्याचा वावर; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर दापोली : आझाद मैदानावर भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव, शाळकरी मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर गणपती झाले आता, दिवाळीसाठी गावाला जा विशेष ट्रेनने कोकण रेल्वे मार्गावर 12 विशेष ट्रेन, वाढत्या प्रवासी गर्दीच्या पार्श्वभूमीवर रेल्वेचा निर्णय रत्नागिरी : गणवेशाची कॉलर पकडून होमगार्डचा गळा दाबला, जीवे मारण्याची धमकी, लखन चिकोडीकर विरोधात गुन्हा दाखल, गणेश विसर्जन बंदोबस्तादरम्यान कुवारबांव येथे प्रकार खेड : तालुक्यात 28 सप्टेंबरला ‘सेवा संकल्प अभियान’, 11 महसूल मंडळांत विशेष शिबिरे

दाभोळ : बंद घर फोडून 34 हजार चोरले

banner 468x60

दाभोळमधील आगरवायंगणी गावात चोरीचा प्रकार समोर आला आहे. या चोरीप्रकरणी आगरवायंगणीमधील एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


घरमालक घरात नसल्याचा फायदा घेऊन घरातील ३४ हजार ९५० रुपयांचा ऐवज चोरून नेल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दाभोळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आनंद देवस्थळी यांचे पोस्टाचा कातळ आगरवायंगणी येथे घर आहे.

१ ते ३ नोव्हेंबर २०२४ या कालावधीत संशयित अक्षय रामाणे याने बंद घरातील १० हजार रुपयांची बॅटरी, ५ हजार रुपयांचा इन्व्हटर, १ इलेक्ट्रिक किटली, १ हिटर स्टोव्ह, स्टेनलेस स्टीलचा सत्तूर, पितळी कुलूप, खिडक्यांना पडदे लावण्याकरीता ब्रकेटचे बॉक्स, इलेक्ट्रिक केबलचे पाच बंडल, एअर पेस्टल

व अन्य सामान चोरले असून याबाबत दाभोळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून दाभोळ पोलीस तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *