लांजा : नवरा दारू पितो म्हणून पत्नीने घेतला गळफास

banner 468x60

दारु पिण्यावरुन पती – पत्नीत वाद झाल्यामुळे पत्नीने रागातून गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना तालुक्यातील चिंचुर्टी हुंबरवणेवाडी येथे गुरुवारी २० फेब्रुवारी रोजी सायंकाळी घडली.

याप्रकरणी लांजा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीसांनी दिलेल्या माहीतीनुसार, तालुक्यातील चिंचुर्टी हुंबरवणेवाडी येथील अजित बबन जाधव (३२ वर्षे) व त्याची पत्नी आराध्या अजित जाधव (३१ वर्षे) हे मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा गाडा हाकत होते.

अशातच गुरुवारी २० फेब्रुवारी रोजी पती अजित जाधव हे घरात दारू प्यायल्याने पत्नी आराध्या आणि अजित यांच्यात जोरदार भांडण झाले. या भांडणातून राग अनावर झाल्याने आराध्या हिने रागाच्या भरात सायंकाळी ४.१५ ते ४.३० वाजण्याच्या सुमारास घरात कोणी नसताना स्वयंपाक खोलीत लाकडी भालाला नायलॉन रस्सीने गळफास घेवून आत्महत्या केली.

हा प्रकार पती अजित जाधव यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी याबाबत लांजा पोलीस ठाण्यात खबर दिली. याप्रकरणी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड. कॉन्स्टे. सचिन भुजबळराव हे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *