Breaking News
खेड : अस्तानमध्ये बिबट्याचा वावर,शाळेच्या परिसरातही बिबट्याचा वावर; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर दापोली : आझाद मैदानावर भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव, शाळकरी मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर गणपती झाले आता, दिवाळीसाठी गावाला जा विशेष ट्रेनने कोकण रेल्वे मार्गावर 12 विशेष ट्रेन, वाढत्या प्रवासी गर्दीच्या पार्श्वभूमीवर रेल्वेचा निर्णय रत्नागिरी : गणवेशाची कॉलर पकडून होमगार्डचा गळा दाबला, जीवे मारण्याची धमकी, लखन चिकोडीकर विरोधात गुन्हा दाखल, गणेश विसर्जन बंदोबस्तादरम्यान कुवारबांव येथे प्रकार खेड : तालुक्यात 28 सप्टेंबरला ‘सेवा संकल्प अभियान’, 11 महसूल मंडळांत विशेष शिबिरे

राजापूर : सलूनमध्ये घुसून दोघांकडून सलून व्यावसायिकचं डोकं फोडलं

banner 468x60

राजापूर तालुक्यातील चव्हाणवाडी येथे सलूनमध्ये घुसून तरुणाला जोरदार मारहाण करून त्याचे डोके फोडून रक्तबंबाळ केल्याची घटना गुरुवारी सायंकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास घडली.

सुरज पुरुषोत्तम चव्हाण (३०, राजापूर, चव्हाणवाडी) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे.


सुरज चव्हाण हा सलूनमध्ये गुरुवारी सायंकाळी ७.३० च्या सुमारास काम करत होता. यावेळी अचानक दोन तरुण सलून मध्ये घुसले. त्यानी सुरज याला जोरदार मारहाण केली. एकाने हातातील कड्याने सुरज याच्या डोक्यात प्रहार केला. यामध्ये सुरजच्या पाठीमागील बाजूने रक्त वाहू लागले.


मारहाण करून दोघेही पळून गेले. सुरज याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्याच्या डोक्यावर ६ टाके टाकण्यात आल्याचे त्याने सांगितले. सुरज याने पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल किली असून पोलिसांनी या तरुणांचा शोध घेत ते दोघे धोपेश्वर येथील असल्याचे समजले.

पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत पोलीस ठाण्यात आणले. साहिल गुरव (२४), आयुष गुरख (२१, राजापूर धोपेश्वर, गुरववाडी) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *