रत्नागिरी येथील एमआयडीसी येथील पुलाखाली कोकण रेल्वेच्या कर्मचाऱ्याने कोणत्यातरी अज्ञात कारणातून आत्महत्या केली.
कर्मचाऱ्यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात आणला होता. या प्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद कऱण्यात आली आहे. संदीप तानाजी लोंढे (वय ४०, रा. कोकण रेल्वे कॉलनी, रत्नागिरी) असे आत्महत्या केलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. ही घटना सोमवारी (ता.४) रात्री साडेबाराच्या सुमारास एमआयडीसी रेल्वे ब्रीज येथे घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार कोकण रेल्वे कर्मचारी संदिप याने कोणत्यातरी अज्ञात कारणातून एमआयडीसी येथील कोकण रेल्वेच्या ब्रीजखाली रेल्वे ट्रकवर आत्महत्या केली.
या प्रकरणी खबर रेल्वे पोलिसांनी ग्रामीण पोलिसांना दिली. माहिती मिळताच ग्रामीण पोलिस घटनास्थळी जाऊन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केला होता. अधिक तपास ग्रामीण पोलिस अमंलदार करत आहेत.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta Live, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
Editor – Tejas Borghare
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*