दापोली : उडाण महासंस्कृती महोत्सवाचं उद्योग आणि मराठी भाषा मंत्री, पालकमंत्री उदय सामंत यांना निवेदन

banner 468x60

7 फेब्रुवारीपासून दापोलीत उडाण महासंस्कृती महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. उडाण सर्व्हिसेस अँड इव्हेंटस् आयोजित उडाण महासंस्कृती महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय.

पालकमंत्री उदय सामंत यांना निवेदन

उडाण सर्विसेस व इव्हेंटस् या कंपनीमार्फत दापोली मध्ये अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. या महोत्सवाचं निवेदन रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री आणि उद्योग आणि मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांना देण्यात आलं आहे. महोत्सवाचे आयोजक यांनी स्वतः प्रत्यक्ष मंत्री महोदय यांची भेट घेऊन निवेदन दिलं आहे.

त्याचप्रमाणे ०७ फेब्रुवारी २०२५ ते १७ फेब्रुवारी २०२५ पर्यंत दापोली महासंस्कृती महोत्सव या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे.

या क्रार्यक्रमात फनफेअर, कंड्युमर शॉपिंग, भव्य पुरस्कार सोहळा, पाककला स्पर्धा, फॅशन शो आणि इतर मनोरंक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *