Breaking News
खेड : अस्तानमध्ये बिबट्याचा वावर,शाळेच्या परिसरातही बिबट्याचा वावर; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर दापोली : आझाद मैदानावर भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव, शाळकरी मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर गणपती झाले आता, दिवाळीसाठी गावाला जा विशेष ट्रेनने कोकण रेल्वे मार्गावर 12 विशेष ट्रेन, वाढत्या प्रवासी गर्दीच्या पार्श्वभूमीवर रेल्वेचा निर्णय रत्नागिरी : गणवेशाची कॉलर पकडून होमगार्डचा गळा दाबला, जीवे मारण्याची धमकी, लखन चिकोडीकर विरोधात गुन्हा दाखल, गणेश विसर्जन बंदोबस्तादरम्यान कुवारबांव येथे प्रकार खेड : तालुक्यात 28 सप्टेंबरला ‘सेवा संकल्प अभियान’, 11 महसूल मंडळांत विशेष शिबिरे

दापोली : नॅशनल हायस्कूल मांदिवली मध्ये स्पर्धा कार्यक्रम

banner 468x60

नॅशनल हायस्कूल मांदिवली मध्ये स्पर्धा कार्यक्रम दि यंग पीपल्स एज्युकेशन सोसायटी मुंबई संचलित नॅशनल हायस्कूल मांदिवली मध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त भाषण व देशभक्ती गीत स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रम अध्यक्ष स्थानी शालेय समिती चेअरमन नूर मोहम्मद मुकादम हे होते. या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे संपूर्ण कार्यक्रम इंग्रजीत घेतला गेला.

कार्यक्रमाची सुरुवात अनस मुजावर याच्या कुराण पठणाने झाली. इरम वसता व मनाल मुकादम यांनी हमद तर इरहम फकी हिने नात सादर केली.

कार्यक्रम प्रास्ताविक व मान्यवरांचे स्वागत शाळेचे मुख्याध्यापक फैयाज सर यांनी केले. स्पर्धेत परीक्षक म्हणून पी.डी. विद्यालय केळशी चे कुदळे सर, जाधव सर, बडे सर हे होते.

भाषण स्पर्धेत इबतिसाम वलेले हि प्रथम, फातीमा अलवारे हि द्वितीय, जुबिया दिवेकर हि तृतीय तसेच देशभक्ती गीत स्पर्धेत इरहम फकी हि प्रथम, नुजहत मुकादम ही द्वितीय आली .

देशभक्ती गीत स्पर्धेत छाप पाडणाऱ्या इरम वस्ता हिला शाळेचा माजी विद्यार्थी अम्मार मुकादम याने रोख रक्कम देऊन गौरव केला.

तर जुबीया दिवेकर हिचा शाळेचे मुख्याध्यापक फैयाज सर यांनी विशेष गौरव केला. याच कार्यक्रमात ऊर्दू प्राथमिक शाळेची विद्यार्थीनी सारा भारदे हिने ईंग्रजीत तर अंशरा ऊंडरे हिने मराठीत भाषण सादर करून उपस्थितांची मने जिंकली. संपूर्ण कार्यक्रम हा इंग्रजीत झाला.

हमद, नात, प्रास्ताविक अध्यक्षीय निवड, अनुमोदन व आभार देखील इंग्रजीत झाले.परीक्षक कुदळे सर, जाधव सर, बडे सर, डाॅ.तांबे यांनी आपल्या मनोगतात कार्यक्रम नियोजन बद्दल व ऊर्दू हायस्कूलचे विद्यार्थीचांले इंग्रजीत बोलू शकतात व त्यांचा आत्मविश्वास वाढवला जातो असे कौतूक केले.या कार्यक्रमासाठी चेअरमन नूर मोहम्मद मुकादम, डाॅ. तांबे, सत्तार मुकादम रोख रक्कम बक्षीस दिली.

तसेच व्हाईस चेअरमन इक्बाल मुकादम, सदस्य गुलाम हुसैन भारदे यांनी कार्यक्रमातील यशस्वी विद्यार्थ्यांना रोख रक्कम देऊन गौरव केला.अध्यक्ष नूर मोहम्मद मुकादम यांनी अध्यक्षीय भाषणात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

कार्यक्रमास शालेय समिती चेअरमन नूर मोहम्मद मुकादम, व्हाईस चेअरमन इक्बाल मुकादम, सदस्य जमालुददीन मुकादम, गुलाम हुसैन भारदे, डाॅ.तांबे, सत्तार मुकादम, ऊर्दू प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक मोमीन सर व शिक्षक, इरशाद मुकादम, नवीद मुकादम, फैयाज खान, अब्दुल कलाम मुकादम, पालक शिक्षक संघ उपाध्यक्ष मेहबूब मुकादम, सहसचिव निगार वलेले, समीरा मुकादम, मांदिवली महिला जमात अध्यक्ष हशमत मुकादम , कुदळे सर, जाधव सर, बडे सर , सर्व विद्यार्थी, शिक्षक व माजी विद्यार्थी, ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रम सूत्रसंचालन जमादार सर व आभार प्रदर्शन शाळेचे मुख्याध्यापक फैयाज सर यांनी केले

कार्यक्रम यशस्वीतेबददल संस्था अध्यक्ष उस्मान मालवणकर , उपाध्यक्ष डाॅ.अजीज सावंत, सचिव अ.कादीर खांचे, सहसचिव अस्लम जुवळे, शालेय समिती चेअरमन नूर मोहम्मद मुकादम , व्हाईस चेअरमन इक्बाल मुकादम , सदस्य जमालुददीन मुकादम, गुलाम हुसैन भारदे, पालक शिक्षक संघ उपाध्यक्ष मेहबूब मुकादम यांनी अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *