लांजा : लग्नाचे आमिष दाखवून 21 वर्षीय तरुणीची फसवणूक, जबरदस्तीने शारीरिक संबंध, राज वर्मा विरोधात गुन्हा दाखल

banner 468x60

लग्नाचे आमिष दाखवून २१ वर्षीय तरुणीशी जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याने ती आठ महिन्यांची गरोदर राहिली आहे. या प्रकरणी लांजा पोलीस ठाण्यात २२ वर्षीय तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

banner 728x90 banner 728x90

ही घटना दिनांक ८ मे २०२४ व जून २०२४ या कालावधीत लांजा शहरात घडली होती.


याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लांजा येथे राहणाऱ्या २१ वर्षीय तरुणीला राज राजू वर्मा (वय २२ वर्षे राहणार कोकणपार्क बिल्डिंग, दुसरा माळा शहनाई हॉलच्या मागे, लांजा) या तरुणाने संबंधित तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून

८ मे २०२४ आणि जून २०२४ या महिन्यात इंदिरा अपार्टमेंट या बिल्डिंगमध्ये तसेच आयशर टेम्पो मध्ये लग्नाचे आमिष दाखवून जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. यामुळे सध्या ती आठ महिन्यांची गरोदर राहिली आहे. या प्रकरणी पिडीत तरुणीने सुरुवातीला १२ जानेवारी २०२५ रोजी खांदेश्वर पोलीस ठाणे, नवी मुंबई येथे फिर्यादी दिली होती.

ही तक्रार झिरो नंबरने १३ जानेवारी रोजी लांजा पोलीस ठाण्याला ऑनलाईन पद्धतीने प्राप्त झाल्यानंतर लांजा पोलिसांनी १३ जानेवारी रोजी राज राजू वर्मा या तरुणावर

भा.द.वि.सं.क. ३७६, ३७६ (२) (एन) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. या घटनेप्रकरणी अधिक तपास पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्या मार्गदर्शानाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक देवकन्या मैंदाड या करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *