दापोली : हुल्लडबाज पर्यटकांवर अखेर गुन्हा दाखल, भरधाव गाडी आणि तरुणांचा डान्स – कोकण कट्टा न्यूज इम्पॅक्ट

Screenshot

banner 468x60

भरधाव कार चालवणाऱ्या हुल्लडबाज पर्यटकांवर अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दापोली मुरुड रोडवर थर्टी फर्स्टच्या दिवशी भरधाव गाडीत तरुणांचा डान्स आणि घोषणा देणारा व्हिडिओ व्हायरल झाला होता.

अखेर या हुल्लडबाज पर्यटकांवर गुन्हा दाखल झाला आहे. हुल्लडबाज पर्यटकांमुळे दपोलीकरांच्या जीवाशी खेळ सुरु आहे का असाही प्रश्न निर्माण झाला होता. चालत्या गाडीत या तरुणाने डान्स आणि घोषणा दिल्या होत्या.

हुल्लडबाज पर्यटकांची गाडी पिंपरी चिचंवडची असून MH 14 EL 7227 असं गाडीचं नंबर आहे, दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संध्याकाळी थर्टी फर्स्टच्या दिवशी 5 वाजता दापोली मुरुड रस्त्यावर होंडा कंपनीची चारचाकी कार भरधाव चालवत इतरांच्या जीवास धोका निर्माण होईल अशा पद्धतीने चालवत हे तरुण निघून गेलॆ

. याची माहिती दापोली पोलीस कॉन्स्टेबल प्रवीण क्षीरसागर यांनी दिली आहे. याप्रकरणी चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल सडकर करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *