पाणी पीत असताना ठसका लागून गिम्हवणे येथील एका ४७ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना दापोली तालुक्यातील आसूद येथे घडली आहे.
दापोली पोलीस ठाण्यात याची आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याबाबत दापोली पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, दत्ताराम गणू कांगणे हे त्यांच्या ४ सहकाऱ्यांसह शुक्रवार दि. २७ डिसेंबर रोजी सकाळी ९.३० वाजता आसूद येथे एका जागेच्या साफसफाईच्या कामाला गेले होते.
सकाळी १०.३० वजनाच्या आसपास पाणी पिण्यासाठी काम थांबवले होते. कांगणे यांच्यासोबत कामाला गेलेले संजय विठ्ठल दुबळे, रा. गिम्हवणे हे पाणी पित असताना अचानक त्यांना ठसका लागला.
त्यानंतर त्यांना २ ते ३ वेळा उचकी लागली व थोड्या वेळाने त्यांनी तेथेच मान टाकली. त्यांना उपचारासाठी दापोलीच्या उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले, तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.
या प्रकरणी दत्ताराम कांगणे यांनी दापोली पोलीस ठाण्यात खबर दिली असून त्यानुसार आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास दापोली पोलीस करत आहेत.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta Live, Media Network
Rg.No.MH-28-0047569 Ratnagiri, Dapoli
Editor – Tejas Borghare
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*