राजापुरात एका तिसरीतील विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी संशयिताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे.
पारस भिकाजी आडीवरेकर (21, तुळसुंदे, राजापूर) असे संशयिताचे नाव आहे. पोलिसांनी त्याला अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
या घटनेने संपूर्ण तालुक्यातुन संताप व्यक्त होत आहे. इयत्ता तिसरीमध्ये शिकणाऱ्या चिमुरडीवर तिच्याच परिसरात राहणाऱ्या एका नराधमाने अत्याचार केले. मुलीवर झालेल्या अत्याचारामुळे तिची प्रकृती बिघडल्यावर प्रथम सरकारी आरोग्य उपकेंद्र व नंतर रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले.
त्यानंतर पीडित मुलीच्या पालकांनी पोलीस ठाणेत फिर्याद दाखल केल्यानंतर संबंधित नराधमाविरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. गुरुवारी त्याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याला न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने 3 दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे. राजापूरच्या पश्चिम किनारपट्टीच्या परिसरात एका तिसरीतील गरीब विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार करत तिला धमकावण्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
यामुळे परिसरात संताप व्यक्त होत आहे. मुलीवर लैंगिक अत्याचारामुळे तीची प्रकृती बिघडल्यावर प्रथम सरकारी आरोग्य उपकेंद्र व नंतर रत्नागिरी सिव्हील येथे उपचारासाठी नेण्यात आले. संबंधित घटनेबाबत मिळालेल्या माहितीनूसार त्या अल्पवयीन मुलीवर परिसरातीलच एका नराधम युवकाकडून वारंवार लैंगिक अत्याचार झाल्याचे निष्पन्न झाले आहे.
मिळालेल्या माहितीनूसार या प्रकरणात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काही अधिकारी व परिसरातील पुढारपणा करणाऱ्या त्या युवकाच्या हितचिंतकांकडून हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न होत असल्याची जोरदार चर्चा परिसरात सुरू आहे. तर संबंधित नराधमाने अत्याचार करून दुसऱ्या मुलाचे नाव सांगण्यासाठी धमकावल्याची चर्चाही परिसरात होत आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*















