दापोली : बेपत्ता तरुणाचा मृतदेह आढळला

banner 468x60

दापोली तालुक्यातील सुकोंडी-मंडलिकवाडी येथील सुरज उर्फ राजू बाळाराम मंडलिक या बेपत्ता 34 वर्षीय तरुणाचा मृतदेह गुरुवारी सुकोंडी वाघिवणे येथील केसरी धरणाच्या पश्चिमेस किनाऱ्यावर आढळून आला.

दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 17 नोव्हेंबर रोजी राजू हा पहाटे सकाळी 5 वाजण्याच्या सुमारास उठून घरातून बाहेर पडला.

त्याला बाहेर जाताना त्याची आई शोभा मंडलिक यांनी पाहिले होते. परंतु तो बाथरूमला गेला असेल असे समजून त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले.

बराच वेळ तो न आल्याने त्याची शोधाशोध केली असता तो कोठेही आढळून आला नाही. यामुळे तो बेपत्ता झाल्याची नोंद 17 नोव्हेंबर रोजी दापोली पोलीस स्थानकात करण्यात आली होती.

12 डिसेंबर रोजी राजूचा मृतदेह सुकोंडी वाघिवणे, केसरी धरणाचे पश्चिमेस धरणाच्या किनाऱ्यावर आढळून आला. त्याचा मृतदेह दापोली उपजिल्हा रुग्णालयात विच्छेदनासाठी आणण्यात आला.

दापोली पोलीस स्थानकात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल आर. बी. मोहिते करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *