दापोली: मंदिर दानपेटी चोराच्या पोलीसांनी पाच तासात मुसक्या आवळल्या, दापोली पोलिसांची फास्ट ट्रक कामगिरी

banner 468x60

दापोली: मंदिर दानपेटी चोराच्या पोलीसांनी पाच तासात मुसक्या आवळल्या दापोली तालुक्यातील चंद्रनगर येथील मंदिरातील दानपेटी काल 30 नोव्हेंबर रोजी चोरट्यांनी फोडल्याचे सकाळी सात वाजता लक्षात आले.

यासंदर्भात दापोली पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानुसार पोलिसांनी आपली चक्रे फिरवून अवघ्या पाच तासांमध्ये

मंदिर दानपेटीतील सहा हजार पन्नास रुपये चोरणाऱ्या महेंद्र सिताराम पवार वय ४७ राहणार जालगाव पांगारवाडी तालुका दापोली या गुन्हेगाराला अटक करून त्याच्याकडून चोरीस गेलेल्या रकमेपैकी ५७७० रुपये रोख रक्कम हस्तगत केली

ही फास्टट्रॅक कामगिरी दापोली पोलीस निरीक्षक अहिरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय अमोल बनकर, हेडकॉन्स्टेबल अजित गुजर, पोकाॅ. मिथुन मस्कर यांनी केली.

दापोली पोलिसांच्या या फास्टट्रॅक कामगिरीबद्दल त्यांचे अभिनंदन केले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *