दापोली :दशानेमा गुजराथी युवक मंडळाच्या अध्यक्षपदी डॉ.कुणाल मेहता यांची निवड

banner 468x60

दीपावलीच्या पूर्वसंध्येला ३०/१०/२०२४ रोजी दापोली येथे श्री राधाकृष्ण मंदिरात दापोली-मंडणगड तालुक्यातील दशानेमा गुजराती समाजाच्या युवक मंडळाची स्थापना करण्यात आली.

banner 728x90

समाजोपयोगी कार्य, व्यवसाय वृद्धी, सण, क्रीडा, आपत्कालीन मदत, एकी हेच बळ अशा अनेक मुद्द्यावर काम करण्याच्या तयारीने ह्या मंडळाची स्थापना करण्यात आली.

या युवक मंडळाचे मार्गदर्शक सर्वश्री अरुण गांधी, राहुल साबळे, आशिष मेहता, समीर तलाठी, समीर गांधी असतील. दिनांक २०/११/२०२४ रोजी श्री राधाकृष्ण मंदिर, दापोली येथे झालेल्या सभेत अध्यक्ष आणि कार्यकारिणी यांची निवड सर्वानुमते करण्यात आली,

ती कार्यकारिणी अशी १) अध्यक्ष:- डॉ. श्री. कुणाल प्रशांत मेहता २) उपाध्यक्ष:- श्री. निकेत रमेश मेहता ३) कार्याध्यक्ष:- श्री. ऋषिकेश विनोद तलाठी ४) सचिव:- श्री. मयुरेश मिलिंद शेठ ५) खजिनदार:- श्री. स्वप्नील संतोष मेहता. कार्यकारिणी विस्तार आणि येत्या वर्षाच्या कार्यक्रमाची रुपरेषा लवकरच जाहीर करण्यात येईल असे ठरले.

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *