दापोली-मंडणगड – महामार्गावर माटवण फाटा येथे दोन – दुचाकींमध्ये झालेल्या भीषण अपघातात एकाचा मृत्यू तर दोघेजण जखमी झाले. शनिवारी (ता. ९) सायंकाळी सातच्या सुमारास हा अपघात झाला.
करंजाणी येथील सुयोग सुरेश सकपाळ (वय २४) व अथर्व अजय कालेकर (१७) हे दोघेजण पिसई येथे दुचाकीने (एमएच ०८ बीए ४४१५) काही कामानिमित्त निघाले होते.
माटवण फाटा येथे त्यांची दुचाकी आली असता महाडकडूनही दोन दुचाकीस्वार (एमएच ०६ सीएन ४३७४) व (एमएच ०६ सीजे ०६२०) येत होते. सुयोग वेगात असल्याने सुयोगची दुचाकी या दोन्ही दुचाकींना धडकली. अपघातात सुयोग सकपाळ याला मेंदूला गंभीर दुखापत होऊन त्याचा मृत्यू झाला.
अथर्व कालेकर व सनी सोपान सुयोग सकपाळ जाधव (२४, रा. महाड) यांना गंभीर दुखापत झाली. त्यावेळेस त्यांना दापोलीमधील उपजिल्हा रुग्णालयात आणले. सुयोग एकुलता होता. त्याला तीन बहिणी आहेत. दोन बहिणींची लग्ने झाले आहेत. तिसऱ्या बहिणीचे लग्न ठरले होते.
घरातील कमावता मुलगा गमावल्याने सकपाळ कुटुंबावर आभाळ कोसळले आहे. सुयोग हा दापोलीमध्ये चैतन्य गॅस एजन्सीमध्ये कामाला होता. अथर्व कालेकर मुंबईमध्येच राहतो. शनिवारी (ता. ९) तो दोन दिवस सुटीला म्हणून गावी आला होता. सुयोग कामावरून आल्यावर अथर्व आणि सुयोग दोघेही पिसई येथे काही कामानिमित्त निघाले.
माटवण फाट्याजवळ अपघात घडला. दोन्ही दुचाकींना ठोकर दिल्यावर सुयोगच्या डोक्याला मार जबर बसला. त्यामुळे त्याचा मृत्यू झाला. अथर्व जखमी झाला त्याचा पाय फॅक्चर झाला. त्याचे कुटुंबीय सर्व मुंबईमध्येच असल्याने त्याला पुढील उपचारासाठी मुंबईत हलवले.
सुयोगच्या मृतदेहाचे रविवारी (ता. १०) सकाळी विच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. पुढे करंजाणीच्या स्मशानभूमीत त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. घटनेची खबर अथर्व कालेकर याने पोलिस ठाण्यात दिली.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta Live, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
Editor – Tejas Borghare
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*