रत्नागिरीतील महिलेला पार्ट टाईम जॉबमधून लाखो रुपये कमवण्याचे आमिष दाखवून 1 लाख 36 हजार रुपयांचा ऑनलाईन गंडा घातल्याचे समोर आले आह़े.
ही घटना 4 ते 10 ऑक्टोबर 2024 दरम्यान घडल़ी. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच या महिलेने शहर पोलिसांत तक्रार दाखल केल़ी. त्यानुसार पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध फसवणूकीचा गुन्हा दाखल केल़ा. 4 ऑक्टोबर रोजी तक्रारदार महिलेला इन्स्टाग्राम अकाऊंटवर पार्टटाईम जॉबसाठी जाहीरात दिसून आल़ी.
या जाहिरातीवर क्लिक केली असता एक व्हॉटसऍप नंबर दिसून आल़ा त्यावर महिलेने संपर्क केला असता तुम्हाला ऑर्डर घ्याव्या लागतील व टास्क पूर्ण करावा लागेल अशी बतावणी करण्यात आल़ी. त्यानुसार महिलेने 500, 2 हजार, 7 हजार 5, 2 हजार, 10 हजार 200 व 34 हजार 624 रुपयांची ऑर्डर करुन टास्क पूर्ण केला.
यानंतर त्यांच्या युजर खात्यावर 3 लाख रुपये जमा झाले असल्याचे दिसून आल़े. खात्यावर जमा झालेले पैसे काढण्यासाठी महिलेकडून विचारणा करण्यात आल़ी. त्यावेळी तुम्हाला टॅक्स भरावा लागेल असे सांगण्यात आल़े. सुरुवातीला 60 हजार 27 रुपये नंतर 30 हजार रुपये, 10 हजार, 20 हजार व 27 हजार अशी वारंवार पैशाची मागणी करण्यात आली.
महिलेने पैसे भरुन देखील त्यांना पैसे मिळाले नाहीत़. यानंतर पुन्हा 75 हजार रुपयांची मागणी करण्यात आल़ी त्यापैकी 20 हजार रुपये महिलेकडून पुन्हा भरण्यात आल़े.
यानंतर कोणताही संपर्क होत नसल्याने आपली फसवणूक झाल्याचे या महिलेच्या लक्षात आल़े. त्यानुसार या महिलेकडून शहर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आल़ी. पोलिसांकडून अज्ञाताविरुद्ध फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आल़ा आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*















