Breaking News
खेड : अस्तानमध्ये बिबट्याचा वावर,शाळेच्या परिसरातही बिबट्याचा वावर; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर दापोली : आझाद मैदानावर भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव, शाळकरी मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर गणपती झाले आता, दिवाळीसाठी गावाला जा विशेष ट्रेनने कोकण रेल्वे मार्गावर 12 विशेष ट्रेन, वाढत्या प्रवासी गर्दीच्या पार्श्वभूमीवर रेल्वेचा निर्णय रत्नागिरी : गणवेशाची कॉलर पकडून होमगार्डचा गळा दाबला, जीवे मारण्याची धमकी, लखन चिकोडीकर विरोधात गुन्हा दाखल, गणेश विसर्जन बंदोबस्तादरम्यान कुवारबांव येथे प्रकार खेड : तालुक्यात 28 सप्टेंबरला ‘सेवा संकल्प अभियान’, 11 महसूल मंडळांत विशेष शिबिरे

दापोली : मारहाण करीत मोबाईल लंपास केल्याप्रकरणी दापोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

banner 468x60

हर्णे मार्गावरील आसूद पूल दरम्यान दोन चारचाकी वाहनांचा अपघात झाल्यावर त्यातील एका वाहनचालकाने दुस-या वाहनचालकाकडे झालेले नुकसान भरून

देण्याची मागणी केल्यावर ते देण्यास नकार दिल्याने दुसऱ्या वाहनातील ३ जणांनी मारहाण करून ७० हजार रुपये किमतीचा मोबाईल लंपास केल्याची तक्रार दापोली पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.

याबाबत दापोली पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार दापोली येथील फराज़ अन्वर रखांगे हे त्यांच्या मोटारीने दापोलीकडे १३ ऑक्टोबर रोजी रात्री ९.२५ च्या दरम्यान येत असताना आसूद पूल येथे आले असता समोरून येणाऱ्या वाहनाने त्यांच्या गाडीच्या उजव्या बाजूच्या आरशाला ठोकर दिली.

रखांगे यांच्याकडे त्या वाहन चालकाने झालेल्या नुकसानीची भरपाई मागितल्यांवर रखांगे यांनी तुम्हीच माझ्या गाडीला ठोकले असून तुम्ही पोलीस स्टेशनला चला असे म्हटल्यावर समोरील ३ जणांना राग आला व त्यांनी रखांगे यांना शिवीगाळ करून त्यांच्या गाडीच्या काचेवर हाताने जोरात फटका मारून काचेचे नुकसान केले व रखांगे यांच्या हातातील ७० हजार रुपये किमतीचा मोबाईल घेऊन निघून गेले.

या प्रकरणी रखांगे यांनी संशयित विष्णू विठ्ठल वाघमारे, विक्रांत विठ्ठल मळेकर, श्रीकांत रमेश मळेकर, सर्व रा. यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. अधिक तपास उपनिरीक्षक यादव करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *