Breaking News
खेड : अस्तानमध्ये बिबट्याचा वावर,शाळेच्या परिसरातही बिबट्याचा वावर; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर दापोली : आझाद मैदानावर भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव, शाळकरी मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर गणपती झाले आता, दिवाळीसाठी गावाला जा विशेष ट्रेनने कोकण रेल्वे मार्गावर 12 विशेष ट्रेन, वाढत्या प्रवासी गर्दीच्या पार्श्वभूमीवर रेल्वेचा निर्णय रत्नागिरी : गणवेशाची कॉलर पकडून होमगार्डचा गळा दाबला, जीवे मारण्याची धमकी, लखन चिकोडीकर विरोधात गुन्हा दाखल, गणेश विसर्जन बंदोबस्तादरम्यान कुवारबांव येथे प्रकार खेड : तालुक्यात 28 सप्टेंबरला ‘सेवा संकल्प अभियान’, 11 महसूल मंडळांत विशेष शिबिरे

राजापूर : सख्खा भाऊ बनला पक्का वैरी! कौटुंबिक वादातून सख्ख्या भावाला चाकूने भोसकलं

banner 468x60

राजापूरमधील पाचल येथे सख्ख्या भावांच्या कौटुंबिक वादात एकानं दुसऱ्याच्या पोटात सुरीने भोसकून त्याला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला.

ही घटना शुक्रवारी घडली आहे. राजापूर तालुक्यातील काजीर्डा राणेवाडी येथे घडली. दरम्यान या घटनेतील गंभीररित्या जखमी झालेल्या भावाला अधिक उपचारासाठी कोल्हापूरला हलविण्यात आले असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

या प्रकरणी राजापूर पोलीस स्थानकामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी राजापूर पोलीस स्थानकामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी काजीर्डा राणेवाडी येथील बाळकृष्ण आत्माराम राणे (72) आणि त्यांचा सख्खा भाऊ शांताराम आत्माराम राणे (56) यांच्यात शुक्रवारी दुपारी 3.30 वाजण्याच्या सुमारास कौटुंबिक कारणावरून वाद सुरू झाला.

हा वाद इतका शिगेला पोहोचला की बाळकृष्ण राणे यांनी रागाच्या भरात आपल्या सख्ख्या भावाला सुरीने भोसकून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. यामध्ये शांताराम राणे हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आला आहे.

याप्रकरणी काजीर्डा गावचे पोलीस पाटील रामचंद्र चंद्रकांत अर्डे (वय 30) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बाळकृष्ण राणे यांच्यावर भारतीय न्याय संहिता अधिनियम 2023 चे कलम 109 प्रमाणे राजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक तपास राजापूर पोलीस उपनिरीक्षक सुधीर उबाळे आणि त्यांची टीम करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *