मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर अपघात, दोन एसटी बसेस समोरासमोर धडकून 25 प्रवाशी जखमी

banner 468x60

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर अपघात झाल्याची घटना घडलीय. यामध्ये दोन एसटी बसेस समोरासमोर धडकून 25 प्रवाशी जखमी झाले आहेत.

banner 728x90 banner 728x90

रात्री 12 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. मुंबई गोवा महामार्गावरील नागोठणे जवळ हा अपघात घडला आहे. मुंबईकर चाकरमान्यावर वाहतूक कोंडीसह हे अपघाताचेविघ्न आले आहे.

मुंबईवरुन राजापूरकडे जाणाऱ्या बसला मुंबईकडे जाणाऱ्या बसने जोरदार धडक दिली. बसेस एकेमकांवर आदळल्याने नागोठणे परीसरात पुन्हा वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे. रात्री गणेशभक्त कोकणच्या दिशेने निघाले. मुंबईतून दीड हजाराहून अधिक एसटीच्या बसेस कोकणच्या दिशेने सोडण्यात आल्या होत्या.

या शिवाय खाजगी वाहनेही हजारोच्या संख्येने तळ कोकणात जाण्यासाठी बाहेर पडली. यामुळे महामार्गावरील वाहनांची संख्या अचानक वाढली आहे. त्यामुळं महामार्गावर कोंडी निर्माण झाली आहे. दोन्ही मार्गिकांवर कोकणात जाणाऱ्या वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. यामुळं वाहतूक ठप्प झाली आहे. सात ते आठ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *