देवरुख : प्रेमातून मुलीकडच्या लोकांकडून तरुणाला मारहाण

banner 468x60

देवरुखमध्ये एकतर्फी प्रेमातून एका तरुणाला मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे. तरुणाने मुलीला तू मला आवडतेस, असं सांगून भेटण्याचा प्रयत्न केला असता मुलीच्या आई-वडिलांनी या मुलाला गाठून तरुणाला मारहाण केली आहे .

मारहाण करताना तरुणाच्या डोक्याला मार लागल्याने तरुण बेशुद्ध अवस्थेत होता. दरम्यान मारहाण करणाऱ्या ५ जणांविरुद्ध देवरुख पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेची फिर्याद तरुणाचे वडील राजू भीमसिंह पवार राहणार देवरुख (घोरपीवाडी) यांनी दिली, ही घटना घडताच देवरुख पोलिसांकडे फिर्याद नोंदवली आहे.

याबाबतचा तपास पोलिस निरीक्षक अतुल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक नामदेव जाधव करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *