सध्या कोणाला कश्यामुळे राग येईल ये सांगता येत नाही. ‘ए बेवड्या, आलास का… या एका वाक्यामुळे ६५ वर्षीय वृद्धेच्या डोक्यात सिलेंडर घालून तिचा निर्दयीपणे खून केल्याची घटना चिपळूणमधील सावर्डेमध्ये घडली.
त्याच गावातील स्वप्निल पर्शुराम खातू (वय ४३) बेस्टमध्ये काम करणार्या प्रौढाला पोलिसांनी अटक केली आहे. संशयित आरोपीला न्यायालयाने ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, यातील पर्शुराम पवार हे निवृत्त पोलीस कर्मचारी असून ते दहिहंडीनिमित्त घराबाहेर गेले होते. वाडीत दहिहंडीचा कार्यक्रम होता. त्यासाठी ते गेले होते. त्याचदरम्यान त्यांची पत्नी सुनिता हिचा खून झाल्याची घटना घडली आहे.गावात दहिहंडीसाठी गेलेला पती पर्शुराम हा ६.४५ वा.च्या सुमारास घरी आला.
यावेळी त्याला घरात अंधार दिसला. घरात लाईट का लागला नाही? पत्नी कुठे गेली? हे पाहण्यासाठी तो खोलीत आला. त्यावेळी पत्नी जमिनीवर पडलेली दिसून आली.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुनिता या रक्ताच्या थारोळ्यात पडल्या होत्या. त्याचवेळी पतीने आरडाओरडा केला आणि आजूबाजूंच्या बोलावून घेतले. शेजारी धावत आले त्यावेळी हा सारा प्रकार उघडकीस आला.
रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या सुनिता पर्शुराम पवार यांचा यांच्या डोक्याचा अक्षरश: चेंदामेंदा झाला होता. डोळे बाहेर आले होते. मेंदू कवटीतून बाहेर आला होता. डोके छिन्नविछीन्न झाले होते.
हा प्रकार पाहून सार्यांनाच घाम फुटला होता.
या घटनेची माहिती तात्काळ सावर्डे पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. रात्रीची वेळ असल्याने ती खोली सिझ करण्यात आली होती. मृतदेह विच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला होता. पोलीस रात्रभर घटनास्थळी ठाण मांडून होते.
पहाट होताच त्यांच्या तपासकार्याला सुरुवात झाली. जागेवर पंचनामा सुरू झाला आणि त्यानंतर पोलिसांच्या हाती एकएक पुरावा मिळू लागला. मात्र आरोपीपर्यंत पोहोचण्यासाठी पोलिसांची कसरत सुरू झाली होती. गावातील गुन्हेगारांची माहिती काढली याबाबतची माहिती देताना पो. अधिक्षक धनंजय कुलकर्णी यांनी सांगितले की, ज्या गावात ही घटना झाली त्या गावातील सर्व गुन्हेगारांची माहिती काढण्यात आली.
तसेच बाहेरील कोणी आले होते का? हे पाहण्यासाठी सीसीटीव्हीदेखील तपासण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळापासून तपासकामाला सुरुवात केली. त्यांच्या घरापासून ५० फुटावर गवतात साडी आणि त्यांच्या घरातील टॉवेल रक्ताने माखलेल्या अवस्थेत मिळून आला. पोलिसांनी तात्काळ श्वानपथकाला पाचारण केले. श्वानाला साडी व टॉवेल याचा वास देण्यात आला. मात्र श्वान तिथल्या तिथेच घुटमळले.पोलीस पंचनामा सुरू असतानाच घरात पोलिसांना एक महत्त्वपूर्ण पुरावा सापडला.
ते म्हणजे आरोपीच्या कानातील असलेले ब्ल्यूटूथ. या ब्ल्यूटूथबाबत चौकशी केली असता हे ब्ल्यूटूथ कोणाचे आहे? याची माहिती पोलिसांना मिळाली आणि त्याचआधारे पोलिसांनी आरोपीच्या अटकेसाठी चक्रव्यूह आखला. या खूनप्रकरणात पोलिसांनी त्या ब्ल्यूटूथच्या सहाय्याने व सीसीटीव्हीमध्ये जे फुटेज सापडले त्याआधारे स्वप्निल पर्शुराम खातू या ४३ वर्षीय प्रौढाला गावातूनच अटक केली.
त्याच्याकडे चौकशी केली असता सुरुवातीला असमाधानकारक उत्तरे दिली. मात्र पोलीसी खाक्या मिळताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली. मिळालेल्या माहितीनुसार यातील संशयित आरोपी स्वप्निल पर्शुराम खातू हा आपल्या मित्रासोबत दुपारी १ वा.च्या सुमारास दारु प्यायला बसला होता व दुपारी तो सुनिता यांच्या घरी गेला. मला ‘ए बेवड्या, आलास का?’ असे म्हणाल्याने मी तिचा खून केल्याचे यातील संशयित आरोपी स्वप्निल याने सांगितले.
यातील मयत सुनिता यांच्यावर साडेतीन तोळ्याचे मंगळसूत्र व दोन सोन्याच्या पाटल्या हातात होत्या. सुनिता यांचा खून करून खातू याने त्यांच्या अंगावरील दागिने घेऊन पळ काढल्याचे पोलिसांनी यावेळी सांगितले.
दरम्यान, याबाबत पो. अधिक्षक धनंजय कुलकर्णी यांनी माहिती देताना सांगितले की, संशयित आरोपी जे कारण सांगतोय ते न पटण्यासारखे कारण आहे. आम्ही वेगवेगळ्या अँगलने तपास करत आहोत. या खूनाचे मूळ शोधून काढणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta Live, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
Editor – Tejas Borghare
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*