राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटना समोर येत असताना महिलांचे भय संपत नाही असंच म्हणावं लागेल. रत्नागिरी जिल्ह्यातील कोकणनगरमध्ये राहणाऱ्या निलेश कृष्णा कोडविलकर याने पत्नीला गरम तवा मारुन दुखापत केली आहे.
गॅस शेगडीवरिल गरम तवा मारुन दुखापत आणि मारण्याची धमकी देणाऱ्या संशयिताविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
निलेश कृष्णा कोडविलकर (रा. मातश्री बंगला, कोकणनगर, रत्नागिरी) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना गुरुवारी (ता. २२) रात्री साडेनऊच्या सुमारास राजनगर येथे घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी यांचे पती निलेश याने त्यांच्याशी भांडण करुन गॅस शेगडीवरील गरम तवा त्यांच्या डाव्या खांद्यावर मारुन दुखापत केली.
तर मारहाण आणि शिवीगाळ करुन मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी फिर्यादी यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयित निलेश कोंडविलकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास शहर पोलिस अमंलदार करत आहेत.
महिलांवरील होणाऱ्या अत्याचाराबाबत महिलांनी तात्काळ रत्नागिरी पोलिसांना संपर्क करा डायल करा 112

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*















