गुहागर : अपूर्वा बारगोडे भाजपच्या महिला मोर्चा अध्यक्षपदी

गुहागर : अपूर्वा बारगोडे भाजपच्या महिला मोर्चा अध्यक्षपदी

banner 468x60

आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने माजी आमदार विनय नातू हे सक्रिय झाले आहेत.

येणाऱ्या निवडणुकीत महिला संघटन सक्षम करण्यासाठी
भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा अध्यक्षपदी वेळंब गावच्या अपूर्वा बारगोडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

या नियुक्तीची घोषणा माजी आमदार विनय नातू यांनी घोषित केली आहे. बारगोडे यांची पार्श्वभूमी पाहिली तर मुलगी डॉक्टर तर मुलगा नोकरीच्या निमित्ताने परदेशात आहे.

भारतीय जनता पार्टीसाठी काम करण्याची इच्छा असल्याने विनय नातू यांनी त्यांच्याकडे गुहागर तालुका महिला मोर्चाची जबाबदारी दिली आहे. डॉ. नातू यांनी दिलेली जबाबदारी सर्वांना बरोबर घेऊन येणाऱ्या निवडणुकीत भाजपला अधिक यश मिळवून देणार अअसल्याचं बारगोडे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *