Breaking News
खेड : अस्तानमध्ये बिबट्याचा वावर,शाळेच्या परिसरातही बिबट्याचा वावर; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर दापोली : आझाद मैदानावर भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव, शाळकरी मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर गणपती झाले आता, दिवाळीसाठी गावाला जा विशेष ट्रेनने कोकण रेल्वे मार्गावर 12 विशेष ट्रेन, वाढत्या प्रवासी गर्दीच्या पार्श्वभूमीवर रेल्वेचा निर्णय रत्नागिरी : गणवेशाची कॉलर पकडून होमगार्डचा गळा दाबला, जीवे मारण्याची धमकी, लखन चिकोडीकर विरोधात गुन्हा दाखल, गणेश विसर्जन बंदोबस्तादरम्यान कुवारबांव येथे प्रकार खेड : तालुक्यात 28 सप्टेंबरला ‘सेवा संकल्प अभियान’, 11 महसूल मंडळांत विशेष शिबिरे

दापोली : अखेर खेम धरणात बुडलेल्या मुलाचा मृतदेह सापडला, NDRF च्या टीमला यश

banner 468x60

खेम धरणात बुडालेल्या 19 वर्षीय कल्पेश बटावळे या मुलाचा मृतदेह अखेर सापडला आहे.

सकाळी आलेल्या NDRF च्या टीमने आज मंगळवारी दुपारी मृतदेह शोधला असून पुढील कार्यवाही साठी रूग्णालयात पाठविण्यात येत असल्याची माहिती दापोली प्रांताधिकारी अजित थोरबोले यांनी दिली आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. सर्व धरण तुडुंब भरली आहेत. हर्णैमधील खेम धरणात चार मुले पोहायला गेली होती. यामध्ये कल्पेश बटावळे हा 19 वर्षाचा मुलगा पाण्यात बुडाला असून इतर मुले सुखरूप आहेत.

सोमवारपासून शोधकार्य सुरु होतं अखेर तो सापडला आहे. दापोली येथे जात असताना घरी न येता हे चारजण हर्णैयेथील खेम येथील धरणावर गेले होते. आंघोळ करण्यासाठी धरणात उतरले असता यामध्ये कल्पेश बटावळे हा 19 वर्षाचा मुलगा पाण्यात बुडाला असून इतर मुले सुखरूप बाहेर आली.

यानंतर तात्काळ पोलिस यंत्रणा उपस्थित राहून शोधकार्य करण्यात आलं मात्र अंधार असल्यामुळे आणि मुसळधार पाऊस , पाणी खोल असल्यामुळे शोधकार्य सकाळी करण्यात येणार असल्याची माहिती दापोलीच्या तहसीलदार अर्चना बोंबे यांनी दिली होती.

अखेर आज मंगळवारी दुपारी 19 वर्षीय कल्पेश बटावळे या मुलाचा मृतदेह अखेर सापडला आहे. सकाळी आलेल्या NDRF च्या टीम ने मृतदेह शोधला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *