Breaking News
खेड : अस्तानमध्ये बिबट्याचा वावर,शाळेच्या परिसरातही बिबट्याचा वावर; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर दापोली : आझाद मैदानावर भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव, शाळकरी मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर गणपती झाले आता, दिवाळीसाठी गावाला जा विशेष ट्रेनने कोकण रेल्वे मार्गावर 12 विशेष ट्रेन, वाढत्या प्रवासी गर्दीच्या पार्श्वभूमीवर रेल्वेचा निर्णय रत्नागिरी : गणवेशाची कॉलर पकडून होमगार्डचा गळा दाबला, जीवे मारण्याची धमकी, लखन चिकोडीकर विरोधात गुन्हा दाखल, गणेश विसर्जन बंदोबस्तादरम्यान कुवारबांव येथे प्रकार खेड : तालुक्यात 28 सप्टेंबरला ‘सेवा संकल्प अभियान’, 11 महसूल मंडळांत विशेष शिबिरे

रत्नागिरी : पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांना वरिष्ठ श्रेणीवर बढती

पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी

banner 468x60

रत्नागिरीचे जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांना वरिष्ठ श्रेणी पोलिस अधीक्षक म्हणून बढती मिळाली आहे. मात्र, रत्नागिरीचे पोलिस अधीक्षक म्हणून ते कार्यरत राहणार आहेत. धनंजय कुलकर्णी यांनी ऑक्टोबर २०२२ मध्ये रत्नागिरीचे पालिस अधीक्षक म्हणून पदभार स्वीकारला.

त्यानंतर राजापूर तालुक्यातील बारसू येथील रिफायनरीचे ज्वलंत आंदोलन त्यांनी अतिशय संयमाने आणि काशल्याने हाताळले. जिल्ह्याची सुरक्षा आणि सामाजिक सलोखा कसा राखला जाईल, याबाबत ते सदैव दक्ष राहतात.

अनेक गंभीर गुन्ह्यांची उकल त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या सहकाऱ्यांनी केली आहे. अंमली पदार्थांच्या विक्रीचा पर्दाफाश करण्यात त्यांचे योगदान महत्त्वाचे आहे. लोकसभा निवडणुकीवेळी त्यांच्या उत्तम नियोजनामुळे जिल्हाभरात कुठेही अनुचित प्रकार न घडता मतदान आणि मतमोजणी या दोन्ही प्रक्रिया अतिशय शांततेत पार पडल्या.


अतिशय शांत, प्रसन्न आणि संयमी व्यक्तिमत्त्व असलेले पोलिस अधीक्षक यांची ही वरिष्ठ श्रेणी पदोन्नती आहे. त्यांच्या पदोन्नतीचे वृत्त बुधवारी सायंकाळी उशिरा जिल्हा मुख्यालयाकडे आले.

त्यांची वरिष्ठ श्रेणी पोलिस अधीक्षकपदी पदोन्नती झाली असली तरीही त्यांच्याकडे रत्नागिरीचाच कार्यभार राहणार आहे. त्यांच्या पदोन्नतीबद्दल सर्वत्र त्यांचे अभिनंदन केले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *