Breaking News
मंडणगडचा पाणीप्रश्न आता इतिहासजमा होणार! 41 कोटी 69 लाखांच्या नळपाणी योजनेचे गृह राज्यमंत्री योगेश कदम यांच्या हस्ते भूमिपूजन, पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडून योगेश कदमांचे कौतुक; नागरिकांना दिवाळीची मोठी भेट दापोली : भाजपला धक्का! युवा मोर्चाचे शहराध्यक्ष विराज खोत यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश, पक्षातील अपमानास्पद वागणुकीचा आरोप करत दिला होता राजीनामा राजापुरात गोवा बनावटीच्या दारूची तस्करी करणारा 26 वर्षीय तरुण जेरबंद, 83 हजारांचा मुद्देमाल जप्त देवरुख : आंबव येथील अपघातातील गंभीर जखमी केतन मोहिते यांची मृत्यूशी झुंज अपयशी, उपचारादरम्यान निधन चिपळूण : दोन दुचाकींची समोरासमोर 56 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

चिपळूण : नागावे येथे तरुणावर कोयतीने वार

banner 468x60

चिपळूणमध्ये धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विकोपाला गेलेल्या वादातून एका तरुणाने दुसऱ्या तरुणावर कोयतीने वार केल्याची घटना तालुक्यातील नागावे चैतन्य फर्निचरच्या परिसरात घडलीय.

यामध्ये उमेश सुदेश जगताप (२४, नागावे) हा जखमी झाला असून वार करणारा लक्ष्मण महादेव वाघे (३५, अलोरे) याच्यावर अलोरे-शिरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.चिपळूण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २७ जून रोजी ८.१५ च्या सुमारास उमेश जगताप हा घरी कुटुंबासमवेत जेवणासाठी बसलेला होता.

यावेळी काही कारणावरून उमेश व लक्ष्मण यांच्यात बाचाबाची झाली. हा वाद विकोपाला गेल्याने यातूनच लक्ष्मण याने रागाने उमेश याच्या घराच्या दाराजवळ असलेली कोयती त्याच्या डाव्या बाजूच्या मानेच्यावर डोक्यात जोरात मारली यामध्ये तो जखमी झाला आहे. पुढील तपास चिपळूण पोलीस करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *