Breaking News
खेड : अस्तानमध्ये बिबट्याचा वावर,शाळेच्या परिसरातही बिबट्याचा वावर; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर दापोली : आझाद मैदानावर भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव, शाळकरी मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर गणपती झाले आता, दिवाळीसाठी गावाला जा विशेष ट्रेनने कोकण रेल्वे मार्गावर 12 विशेष ट्रेन, वाढत्या प्रवासी गर्दीच्या पार्श्वभूमीवर रेल्वेचा निर्णय रत्नागिरी : गणवेशाची कॉलर पकडून होमगार्डचा गळा दाबला, जीवे मारण्याची धमकी, लखन चिकोडीकर विरोधात गुन्हा दाखल, गणेश विसर्जन बंदोबस्तादरम्यान कुवारबांव येथे प्रकार खेड : तालुक्यात 28 सप्टेंबरला ‘सेवा संकल्प अभियान’, 11 महसूल मंडळांत विशेष शिबिरे

दापोली : गांजा सेवन करणाऱ्या 4 मुलांना आडे पोलिसांनी घेतले ताब्यात

banner 468x60

दापोली तालुक्यातील केळशी गावात गांजा सेवन करणाऱ्या 4 अल्पवयीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. या चार मुलांकडून चिलीम आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे.

यातील तिघांना पोलिसांनी रविवारी ताब्यात घेतले. संशयित मुख्य सूत्रधार फरार झाला मात्र त्याला दुसऱ्या दिवशी ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले. केळशी गुजरवाडा येथील खाडी किनारी असलेल्या छोट्या जेटीवर नेहमी रात्री अपरात्री दारू पिण्यासाठी आणि सिगारेट ओढण्यासाठी काही तरूण जात असतात.

रविवारी साडेसहाच्या सुमारास एका मुलाचा संशय आल्याने स्थानिक ग्रामस्थ विचारणा करण्यास गेले असता त्यांच्याकडे चीलीम सापडली आणि हा प्रकार जेटीवर असणाऱ्या इतर तीन मुलांना समजल्यावर त्यांनी काही वस्तू फेकून दिल्या. यातील मुख्य सूत्रधार घटनास्थळावरून पसार झाला व अन्य तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

त्यांच्याकडे गांजा ओढणारी चीलीम सापडली. मूख्य सूत्रधाराची गाडी तेथेच ठेवण्यात आली होती. परंतु चावी त्याच्याकडे असल्याने तो सकाळी पहाटे कोणी नसताना गाडी घेवून जाण्याच्या उद्देशाने आला तेव्हा ग्रामस्थांनी पकडले.

त्याच्याकडेही चीलीम आणि वापर केलेला कागद सापडले आणि इतर तिघांमधील एकाचा मोबाईल सापडला आहे. आडे दूरक्षेत्राचे अमंलदार राजू मोहिते यांनी तिघांना, तर मुख्य सूत्रधाराला दुसऱ्या दिवशी ताब्यात घेतलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *