पोलिसांनी छापा टाकून येथील वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश केल्यानंतर आता अनेक चर्चा ऐकण्यास मिळत आहेत. गेल्या चार ते पाच महिन्यापासून हा व्यवसाय येथे सुरू होता. तसेच काही एजंट देखील नियुक्त करण्यात आले होते.
त्या माध्यमातून बिनभोटपणे हैदोस घातला जात होता. याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून एकाला ताब्यात घेण्यात आले आहे. मात्र जिल्ह्याची सांस्कृतिक राजधानी असलेल्या चिपळूणला देहविक्रीचा डाग लागला, अशी संतप्त प्रतिक्रिया उमटू लागली आहे.
चिपळूण शहरातील मध्यवर्ती ठिकाणी एका प्रसिद्ध हॉटेलच्या मागे गल्लीत असलेल्या बिल्डिंगमध्ये फ्लॅट घेऊन त्याठिकाणी चक्क वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती चिपळूण पोलिसांना मिळाली होती. माहितीची खातरजमा करण्यासाठी पोलिसांनी देखील बारीक लक्ष ठेवले होते.
पूर्ण खात्री झाल्यानंतर जिल्हापोलीस अधीक्षक तसेच अप्पर जिल्हाअधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवींद्र शिंदे तसेच स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सापळा रचून शुक्रवारी सायंकाळी छापा टाकला आणि सर्वकाही उघड झाले.
प्रत्यक्षात या संदर्भात तपासाचा भाग म्हणून पोलिसांनी पूर्ण माहिती उघड केली नसली तरी याविषयाची मोठी चर्चा आता चिपळूणमध्ये ऐकण्यास मिळत आहे. हा फ्लॅट गेले काही महिने बंद होता. त्यानंतर मित्राच्या ओळखीने फ्लॅट ताब्यात घेऊन त्याठिकाणी चक्क वेश्याव्यवसाय सुरू करण्यात आला. गेले चार ते पाच महिने हा व्यवसाय येथे सुरू असल्याची चर्चा ऐकण्यास मिळत आहे.
दोन एजंट मार्फत येथे ग्राहक आणले जात होते. त्यामध्ये एक महिला व एका पुरुषाचा समावेश होता. त्या दोघांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आता पोलिसांनी पुढील तपास सुरू केला असून यामध्ये देहविक्री करणार्या महिला कोठून आणण्यात आल्या होत्या? त्या स्वतः हा व्यवसाय करत होत्या की त्यांना जबरदस्तीने यामध्ये गुंतवण्यात आले होते? या प्रकरणात आणखी कितीजण आहेत?
यासंदर्भात पोलिसांनी वेगाने तपास सुरू केला आहे. लवकरच याप्रकरणाची पोलखोल होऊन सत्य बाहेर पडण्याची शक्यता आहे. मात्र या संपूर्ण प्रकरणाने चिपळूणमध्ये संताप व्यक्त करण्यात येत असून ही कीड समूळनष्ट करण्याची मागणी देखील होऊ लागली आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*















