गुहागर : वीज खांबांचे नुकसान एसटीमुळे नाही, आगारप्रमुख सोनल कांबळे यांचं स्पष्टीकरण

banner 468x60

पाटपन्हाळे कोंडवाड़ी येथील सर्व्हिस वायरसह वीजखांब एसटी बसने ओढत नेल्याने नुकसान झाले, असे महावितरणकडून प्राप्त झालेल्या पत्रात म्हटले आहे.

मात्र, त्या प्रकाराशी गुहागर आगाराच्या बसचा काहीही संबंध नाही, अशी प्रतिक्रिया गुहागर आगारप्रमुख सोनल कांबळे यांनी दिली. एसटी बसने सर्व्हिस वायरला तोडून तीन वीजखांब ओढत ती सुसाट निघून गेल्याचा प्रकार तालुक्यातील पाटपन्हाळे कोंडवाडी येथे गुरुवारी घडला होता.

या प्रकारामुळे महावितरणचे सुमारे ४० हजारांचे नुकसान झाल्याने भरपाईबाबत महावितरणने गुहागर आगाराला याबाबत पत्र देऊन नुकसान भरपाईची मागणी केली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *