मंडणगड : बशीर एम हजवानी फाऊंडेशनतर्फे मंडणगड गावाला रुग्णवाहिका भेट

मंडणगड : बशीर एम हजवानी फाऊंडेशनतर्फे मंडणगड गावाला रुग्णवाहिका भेट

banner 468x60

कोकणात अनेक सामाजिक उपक्रम करणारी म्हणून बशीर एम हजवानी फाऊंडेशनचं नावलौकिक आहे. सामाजिक भावना लक्षात घेऊन बशीर एम हजवानी फाऊंडेशनतर्फे मंडणगड गावाला रुग्णवाहिका देण्यात आलेली आहे.

मंडणगड येथील जमात-उल-मुस्लिमीन यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होतं. या कार्यक्रमाला डॉ. सुफयान काझी यांची विशेष उपस्थिती पाहायला मिळाली. अत्याधुनिक आरोग्यसुविधांनी सुसज्ज अशी ही रुग्णवाहिका नुकतीच मंडणगड गावाला सुपूर्द करण्यात आली.

डॉ. सुफयान काझी यांच्या मार्फत रुग्णवाहिकेची चावी गावाला सुपूर्द करण्यात आली. पवित्र कुराण पठणानंतर मुफ्ती सुफियान काझी यांनी वैद्यकीय मदत आणि आमचा धर्म इस्लाम यावर प्रकाश टाकला.

बशीर हिजवानी यांनी रुग्णवाहिका सेवेच्या उद्देशावर प्रकाश टाकला आणि त्यामागे कोणताही दिखावा किंवा लाभाचा हेतू नसल्याचं सांगून केवळ आपल्या मंडणगड गावाला ही भेट असल्याचं सांगितलं.

हे काम सेवेच्या भावनेने केले जाते असं बशीर हिजवानी यांनी म्हटलं. जनतेच्या सेवेसाठी रुग्णवाहिका उपलब्ध करून देत, जनतेसमोर एक सामाजिक आदर्श ठेवला आहे. मंडणगड जमात अध्यक्षांनी सर्व पाहुण्यांचे मनापासून आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *