Breaking News
खेड : अस्तानमध्ये बिबट्याचा वावर,शाळेच्या परिसरातही बिबट्याचा वावर; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर दापोली : आझाद मैदानावर भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव, शाळकरी मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर गणपती झाले आता, दिवाळीसाठी गावाला जा विशेष ट्रेनने कोकण रेल्वे मार्गावर 12 विशेष ट्रेन, वाढत्या प्रवासी गर्दीच्या पार्श्वभूमीवर रेल्वेचा निर्णय रत्नागिरी : गणवेशाची कॉलर पकडून होमगार्डचा गळा दाबला, जीवे मारण्याची धमकी, लखन चिकोडीकर विरोधात गुन्हा दाखल, गणेश विसर्जन बंदोबस्तादरम्यान कुवारबांव येथे प्रकार खेड : तालुक्यात 28 सप्टेंबरला ‘सेवा संकल्प अभियान’, 11 महसूल मंडळांत विशेष शिबिरे

दापोली : नॅशनल हायस्कूल मांदिवलीत जागतिक योग दिन साजरा

दापोली : नॅशनल हायस्कूल मांदिवलीत जागतिक योग दिन साजरा

banner 468x60

नॅशनल हायस्कूल मांदिवलीत जागतिक योग दिन साजरा करण्यात आला आहे. दि यंग पीपल्स एज्युकेशन सोसायटी मुंबई संचालित नॅशनल हायस्कूल मांदिवलीत जागतिक योग दिन साजरा करण्यात आला.

कार्यक्रम अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक फैयाज सरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं असून अनस मुजावर याने कुराण पठण सादर केलं. परकार आणि जमादार यांनी योगाचे महत्व आणि सोबतच मार्गदर्शन केलं आहे.

अध्यक्षीय भाषणात फैयाज यांनी निरोगी जीवन जगण्यासाठी आवश्यक असलेले सर्व घटक आणि योगाची ऐतिहासिक पार्श्वभूमी मांडली. रेहान खान यांनी विद्यार्थ्यांना विविध प्रकारचे योगासनांची प्रात्यक्षिक करून दाखवली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जमादार यांनी केलं.


कार्यक्रम यशस्वीतेबद्दल संस्था अध्यक्ष उस्मान मालूनकर, उपाध्यक्ष डॉ. अजीज सावंत, सचिव अ.कादीर खांचे, सहसचिव अस्लम जुवळे, शालेय समिती चेअरमन नूर मोहम्मद मुकादम, व्हाईस चेअरमन इक्बाल मुकादम, सदस्य जमालुददीन मुकादम , गुलाम हुसैन भारदे, पालक शिक्षक संघ उपाध्यक्ष मेहबूब मुकादम व ग्रामस्थ यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *