Breaking News
दापोली : मुजीब रुमाणेंसह 32 गावांतील कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश रत्नागिरी : अंजनारी पुलाजवळ कंटेनरची पोलीस वाहनाला धडक, दोन पोलीस अंमलदारांसह चालक गंभीर जखमीमुंबई-गोवा महामार्गावरील अपघातात दोन्ही वाहने उलटली खेडमधील उद्योजक उत्तमकुमार जैन यांच्या कार तोडफोड प्रकरणाचा छडा, तीन आरोपी अटकेत, पाचपैकी तिघांना अटक दापोली : धक्कादायक 50 वर्षीय व्यक्तीविरोधात लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल, लग्नाचे आमिष दाखवून वारंवार अत्याचार केल्याचा आरोप, इच्छेविरुद्ध गर्भपात घडविल्याची तक्रार, पीडितेच्या मुलालाही जीवे मारण्याची धमकी मंडणगड : पंचायत समितीच्या सभापतींना मिळाले हक्काचे नवे वाहन, तालुक्यातील दौऱ्यांसाठी होणारी गैरसोय दूर

गुहागर : ग्रामसेविकेची 67 हजारांची फसवणूक

banner 468x60

गुहागर तालुक्यातील सडे जांभारी येथील ग्रामसेविकेची ६७ हजार ५०० रुपयांना फसवणूक केल्याचा प्रकार घडला आहे. या फसवणूक प्रकरणात पतीचा मित्र असल्याचे भासवले हजारो रुपये उकळले.

याप्रकरणी गुहागर पोलिस स्थानकात एकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार ८ मे २०२४ रोजी दुपारी आबलोली-काष्टेवाडी येथे घडला.

याप्रकरणी अपूर्वा अमोल हुमणे (३८) यांनी फिर्याद दिली आहे. अपूर्वा हुमणे यांना अमरेश कुमार नावाच्या व्यक्तीने ९५६५६७९०९२ या मोबाइलवरून फोन करून त्यांच्या पतीचा मित्र असल्याचे सांगितले.

त्यानंतर अपूर्वा हुमणे यांच्या खात्यावर पैसे पाठवायचे असल्याचे सांगितले. त्यानंतर त्याने हुमणे यांच्या खात्यामध्ये १० हजार, २५ हजार आणि दोनवेळा ४५ हजार रुपये अशी रक्कम हस्तांतरित केल्याचे खोटे मेसेज पाठविले. त्यानंतर त्याने बँक ऑफ इंडियाच्या गुहागर शाखेतील खात्यातून ६७,५०० रुपये मोबाइल क्रमांशी कनेक्ट असलेल्या दुसऱ्या खात्यावर ट्रान्सफर करण्यास सांगितले.

या प्रकरणात आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच अपूर्वा हुमणे यांनी थेट गुहागर पोलिस स्थानक गाठले. याप्रकरणी अमरेश कुमार याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *